महिलेवर चोरट्याचा चाकुहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST2021-06-09T04:15:56+5:302021-06-09T04:15:56+5:30

फोटो पी ०८ परतवाडा फोल्डर परतवाडा : शहरातील ब्राह्मण सभा कॉलनीत वकील सुरेंद्र घुलक्षे यांच्या घरी शिरलेल्या चोरट्याने ...

Thief stabs woman | महिलेवर चोरट्याचा चाकुहल्ला

महिलेवर चोरट्याचा चाकुहल्ला

फोटो पी ०८ परतवाडा फोल्डर

परतवाडा : शहरातील ब्राह्मण सभा कॉलनीत वकील सुरेंद्र घुलक्षे यांच्या घरी शिरलेल्या चोरट्याने त्यांच्या सुनेवर चाकूने वार केला. सोमवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. यानंतर चोरट्याने पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी रात्री १० च्या सुमारास घरातील वरच्या माळ्यावर बाथरूममध्ये चंचल घुलक्षे या कपडे धुत होत्या. त्यांना कुणी तरी घरात उडी मारून प्रवेश घेतल्याची चाहूल लागली. त्यावर आवाज दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा पावलांचा आवाज आल्याने त्यांनी दार उघडले तोच चोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. घाबरलेल्या चंचल यांनी दार बंद करून किंकाळी फोडताच खाली घरात बसलेले सासरे सुरेंद्र घुलक्षे, सासू लता, नणंद स्नेहा व परिसरातील नागरिक धावून आले. तोपर्यंत चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. चंचल यांच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला. याप्रकरणी प्रतीक घुलेक्षे यांनी परतवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम ३९४ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बॉक्स

पोलिसांची शोधमोहीम, सीसीटीव्ही तपासले

पोलिसांनी तात्काळ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम चालविली. तर परिसरातील सीसीटीव्हीसुद्धा तपासले. अज्ञात चोरटा २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, लाल रंगाचा शर्ट व काळा पॅंट घातला असल्याची माहिती पुढे आली आहे.

कोट

ब्राह्मणसभा परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीसुद्धा माहिती घेतली जात आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा

Web Title: Thief stabs woman