'ते' अतिक्रमण अखेर पाडलेच !
By Admin | Updated: June 9, 2015 00:36 IST2015-06-09T00:36:38+5:302015-06-09T00:36:38+5:30
रामपुरी कॅम्प झोन अंतर्गत येणाऱ्या पॅराडाईज कॉलनीत मो. आबीद यांचे घर आणि अगरबत्ती तयार करणारा कारखाना...

'ते' अतिक्रमण अखेर पाडलेच !
आयुक्तांची देखरेख : घरासंदर्भात आठ दिवसाचा अवधी
अमरावती : रामपुरी कॅम्प झोन अंतर्गत येणाऱ्या पॅराडाईज कॉलनीत मो. आबीद यांचे घर आणि अगरबत्ती तयार करणारा कारखाना नियमबाह्य असल्याप्रकरणी हा कारखान्याचे अतिक्रमण सोमवारी हटविण्यात आले. तसेच घराचे अतिरिक्त बांधकाम संदर्भात आठ दिवसात रीतसर करुन घेतले नाही तर ते प्रशासन हटविणार असा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला.
गत आठवड्यात घर मोजणी अभियानाला विरोध करताना पॅराडाईज कॉलनी येथील रहिवासी मो. आबीद यांनी कर्मचाऱ्यांना नकार देत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी पोलिसात फौजदारी दाखल करण्यात आली आहे. परंतु हे प्रकरण ऐवढ्यावरच थांबले नसून नियमबाह्य अगरबत्ती तयार करण्याचा कारखाना पाडण्यात आला आहे. ही कारवाई करताना प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
कारवाई दरम्यान आयुक्त गुडेवार हे देखील उपस्थित होते. मो. आबीद यांनी घराचे बांधकाम अतिरिक्त असल्याने ते नियमित करण्यासाठी आठ दिवसांच्या कालावधी देण्यात आला. अन्यथा संबंधित बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अगरबत्ती तयार करणारा कारखान्याचे अतिक्रमण पाडले जात असताना परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
यावेळी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, उपअभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, अभियंता मनोज शहाळे, पोलीस निरीक्षक खराटे आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
आयुक्तांना मिळाले पोलीस अंगरक्षक
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सुरु केलेल्या कार्यप्रणालीमुळे त्यांच्यावर अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. शहरात पाहणी दौरे, अतिक्रमण कारवाईदरम्यान त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने गुडेवार यांना स्वतंत्र पोलीस अंगरक्षक नेमले आहे. पिस्तूलधारी कमांडो सतत त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे.