‘त्यांनी’ अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारावर पाहिली मरणाची वाट
By Admin | Updated: March 19, 2015 00:20 IST2015-03-19T00:20:45+5:302015-03-19T00:20:45+5:30
तब्बल अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारासमोर विव्हळणाऱ्या क्षय रुग्णाला मंगळवारी अखेर मृत्यूने गाठलेच. दादाराव तेलमारे (६६, रमाबाई आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे.

‘त्यांनी’ अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारावर पाहिली मरणाची वाट
लोकमत विशेष
वैभव बाबरेकर अमरावती
ृतब्बल अर्धा तास इर्विनच्या प्रवेशद्वारासमोर विव्हळणाऱ्या क्षय रुग्णाला मंगळवारी अखेर मृत्यूने गाठलेच. दादाराव तेलमारे (६६, रमाबाई आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे.
दादाराव यांच्यावर क्षय रुग्णालयात उपचार सरू होते. मंगळवारी ते अचानक इर्विनच्या द्वारानजीक दाखल झाले. ते अत्यवस्थेत पडून होते. कुणीच त्यांच्याकडे लक्ष देऊन रुग्णालयात दाखल केले नाही. अखेर अर्ध्या तासाने इर्विनच्या पोलीस चौकातील शंकर कास्देकर व सायकल स्टॅन्डवरील बाबाराव यांनी नंदू नावाच्या कर्मचाऱ्याला सांगून दादारावला दाखल करविले.
बरेचसे निराधार नागरिक रुग्णालय परिसरात भीक मागतात. अनेकदा तेथेच झोपून राहतात. त्यामुळे प्रत्येक जणांवर लक्ष ठेवता येत नाही. अशा अनेक निराधारांंकडे मी जातीने लक्ष दिले आहे. शासन व सेवाभावी संस्थांना पुढाकार घेऊन निराधारांसाठी काही केले पाहिजे.
-अशोक वणकर,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.
अनेक वयोवृद्धांवर संकट
४शहरात अनेक वयोवृध्द नागरिक काही ना कारणावरून कुटुंबीयांपासून विभक्त झाले आहेत. शहरात सतत ते भंटकती करीत आहेत. त्यांचा वाली कोण, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये शहरात अनेक अनोळखी व्यक्तीचे मृत्यू झाले आहेत. अनेकजण आताही मृत्यूशी झुंज देत आहे. त्यांना उपचारकरिता आरोग्य सेवा कोण पुरवेल, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.