- त्यांनी मसाल्याऐवजी भाजीत टाकले उंदीर मारण्याचे औषध
By Admin | Updated: March 19, 2017 00:04 IST2017-03-19T00:04:53+5:302017-03-19T00:04:53+5:30
रात्री स्वयंपाक करताना भाजीचा मसाला समजून त्यांनी उंदीर मारण्याचे औषध टाकले आणि तीच भाजी खाल्ल्याने तिघांची प्रकृती बिघडली.

- त्यांनी मसाल्याऐवजी भाजीत टाकले उंदीर मारण्याचे औषध
तिघांची प्रकृती बिघडली : शिराळा येथील घटना
अमरावती : रात्री स्वयंपाक करताना भाजीचा मसाला समजून त्यांनी उंदीर मारण्याचे औषध टाकले आणि तीच भाजी खाल्ल्याने तिघांची प्रकृती बिघडली. ही घटना शुक्रवारी रात्री शिराळा गावात घडली. त्यांना शनिवारी सकाळी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिराळा येथील रहिवासी संजय बडे यांच्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय असून पोल्ट्रीतील पक्ष्यांना सांभाळण्याची जबाबदारी वंसता बिसराम मावस्कर (३०), मोतीलाल भैयालाल बारस्कर (६०) व त्यांची पत्नी रुपली मोतीलाल बारस्कर (५०) यांच्याकडे होती. तिघेही तेथे राहत असल्यामुळे त्यांचा एकत्रीत स्वयपांक होता. त्यामुळे स्वयपांकाचे सर्व साहित्य घरात आणून ठेवले होते. त्यातच उंदरांचा त्रास असल्यामुळे त्यांनी विषारी औषध घरी आणले होते. शुक्रवारी रात्री बारस्कर कुटुंबातील सदस्य स्वयपांक करीत असताना चन्याची भाजी बनवित होते. दरम्यान भाजीत मसाला टाकण्याची त्यांच्या हातात उंदीर मारण्याचे औषध आले आणि चुकून ती औषधी टाकण्यात आली. त्यांनी पहाटेच शिराळा येथील प्राथमिक रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतरही तिघांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरु केल्यामुळे दुपारपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.