शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

क्वारंटाईन राहून ‘ते’ करताहेत शाळेची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमध्ये मुंबई पुण्याहून मेळघाटातील तेलखार येथे स्वगृही आलेल्या कामगारांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. या आठ आदिवासी युवकांनी कुठल्याच प्रकारची तक्रार न करता स्वत:हून आपल्या शाळेचा सर्व परिसर स्वच्छ करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देतेलखारच्या शाळेत निवास : आदिवासी विद्यार्थ्यांचा असाही आदर्श

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : लॉकडाऊनमध्ये मुंबई पुण्याहून मेळघाटातील तेलखार येथे स्वगृही आलेल्या कामगारांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. या आठ आदिवासी युवकांनी कुठल्याच प्रकारची तक्रार न करता स्वत:हून आपल्या शाळेचा सर्व परिसर स्वच्छ करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.ज्या शाळेत बालपणी शिक्षण घेतले. त्याच शाळेत पुन्हा यावे लागेल व काही दिवस मुक्कामी राहावे लागेल, असा विचारही न करणाऱ्या त्या आदिवासी तरूणांनी क्वारंटाईन हसतमुखाने स्वीकारले. त्या आठ माजी विद्यार्थ्यांनी तेथे स्वस्थ न बसता आपल्या शाळेच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. सतीश बेलसरे, रवींद्र बेलसरे, विशाल जामुनकर, लक्ष्मण दिवाकर, नारायण हेकडे, अक्षय हेकडे, अर्जुन मरस्कोल्हे, तिलकराम बारसकर, अशी या माजी विद्यार्थी तथा मुंबई पुण्याहून आलेल्या कामगारांची नावे आहेत. क्वारंटाईन ठिकाणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जात असताना या आदिवासी विद्यार्थी वजा कामगारांनी कुठल्याच प्रकारे प्रशासनाची तक्रार न करता उलट त्यांच्याप्रती सहकार्याची भावना ठेवत वेगळा संदेश दिला आहे.प्रशासनाचे सहकार्यशाळा सुरू झाल्यानंतर आपल्याच गावकऱ्यांना नीटनेटके आणि स्वच्छ वातावरण मिळेल, त्या उद्देशाने ही मोहीम राबविली गेली. उन्हाळ्याचा दिवसांत शाळा व परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. चिखलदऱ्यांच्या तहसीलदार माया माने यांनी त्यांचे कौतुक केले. सरपंच अनिता बेलसरे, उपसरपंच राजू मोरे, सचिव रवींद्र मोहोड, पोलीस पाटील सुमरिता ठाकरे, शिक्षक सोहन कासट, आशा वर्कर मीरा राणे, बेबी मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष, पेसा अध्यक्ष, आदींचेसुद्धा त्यांना चांगले सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या