निराश्रितांसाठी ते ठरतात देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:34+5:302021-04-05T04:11:34+5:30

फोटो पी ०४ धामणगाव हेल्पिंग हॅन्डचा पुढाकार, एका तासात मिळतो मदतीचा हात मोहन राऊत धामणगाव रेल्वे : घरात ...

They become angels for the homeless | निराश्रितांसाठी ते ठरतात देवदूत

निराश्रितांसाठी ते ठरतात देवदूत

फोटो पी ०४ धामणगाव

हेल्पिंग हॅन्डचा पुढाकार, एका तासात मिळतो मदतीचा हात

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : घरात अठराविश्व दारिद्रय असल्याने दोन वेळेची सांज भागत नाही. रस्त्यावर झोपून उपाशी राहावे लागते. अपघात झाला तर मदत मिळत नाही. शिक्षणाची मनात इच्छा असताना आर्थिक परिस्थिती नाही, अशा वेगवेगळ्या निराश्रितांसाठी ते देवदूत ठरले आहेत.

धामणगाव शहर हे विद्यानगरी सोबतच आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरातील काही नवयुवकांनी एकत्र येऊन ‘हेल्पिंग हॅन्ड’ नावाचा ग्रुप एका वर्षापूर्वी तयार केला. या ग्रुपमध्ये सर्व उच्चशिक्षित व व्यावसायिक नवयुवक आहेत. ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचे ऋण फेडावे म्हणून हे नवयुवक तळमळीने सामाजिक कार्य करीत आहेत. तालुक्यातील वृद्धाश्रमात गादी, चादर, वृद्धांना औषधी, गॅस कनेक्शन सोबतच अन्नधान्याची व्यवस्था त्यांनी एका वर्षात केली. जळका पटाचे येथील दिव्यांग व्यक्तीची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. शहरातील निराधाराच्या घरी धान्य पोहोचून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, ज्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था होत नाही, त्यांना आर्थिक बळ देणे, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार देण्यासाठी या हेल्पिंग हँड्सचा पुढाकार असतो.

एका क्लिकवर होतेय रक्कम जमा

धामणगाव गॅस अँड डोमेस्टिक अप्लायसन्सचे संचालक निखिल भंसाली यांच्या माध्यमातून हा ग्रुप तयार करण्यात आला. यातील सर्व युवकांनी आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेत. कामाच्या पसाऱ्यात अनेकांची महिने दोन महिने भेट होत नसली तरी दर महिन्याला फोनपेद्वारे एका क्लिकवर रक्कम जमा होते आणि त्यातून महिनाभर ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना ती पुरविली जाते. यात आलोक पोळ, वैभव इंदानी, विक्रम बुधलानी, सुमित बोराखडे, सागर ठाकूर, निखिल भंसाली, अनुपम जैन, अमित चौधरी, प्रशांत वाणी, अमर साकुरे, गोविंद राठी, संदीप राऊत, मुकुंद मुंधडा, हितेश विहिरे, महेश पनपालिया, पीयूष मुंधडा, अखिलेश बुधवारे, भूषण कांडलकर, हेमंत हरोडे, अमोल तिनखडे, सोहेब कुरेशी, आशिष कुकडे, सुनेश भुसारी, श्रीकांत टाले, सचिन भोसले यांचा सहभाग आहे.

-------------

Web Title: They become angels for the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.