शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

 म्हणून ⁠⁠⁠तो पत्नीच्या फोटोवर करायचा फायरिंग, आरोपीकडून देशी कट्टा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:15 IST

 अमरावती - पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला. मंगळवारी पोलिसांनी संजय वसंत दळवी (३५,रा.शेगाव, अमरावती) याला देशी कट्टा विक्री करण्याच्या बेतात असताना अटक केली आणि त्याच्याजवळील देशी कट्टा जप्त केला आहे. शेगाव ...

 अमरावती - पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला. मंगळवारी पोलिसांनी संजय वसंत दळवी (३५,रा.शेगाव, अमरावती) याला देशी कट्टा विक्री करण्याच्या बेतात असताना अटक केली आणि त्याच्याजवळील देशी कट्टा जप्त केला आहे. शेगाव परिसरातील रहिवासी संजय दळवी केवल कॉलनीत नागरिकांना देशी कट्टा विक्री करीत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अरुण कोडापे, पोलीस शिपाई अहमद अली, विक्की नशिबकर, प्रशांत वानखडे यांचे पथक केवल कॉलनीत पोहोचले. दरम्यान पोलिसांनी संजय दळवीची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत देशी कट्टा खोचलेला आढळून आला. पोलिसांनी संजय दळवीला अटक करून देशी कट्टा जप्त केला. त्याच्याविरुध्द ३, ७ आर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे, संजय दळवी याने चार महिन्यांपूर्वी घरात फायरिंग केल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. वर्षभरापूर्वी संजय दळवीची पत्नी जळून मृत्यू पावली. तीच्या मृत्युला कारणीभुत असल्याचा आरोप संजयच्या आईवर लागला होता. तेव्हापासून संजयच्या मानसिकतेवर आघात झाला. तो घरातील भिंतीवर पत्नीचा फोटो लावून फोटोवर फायरींग करीत असल्याचे काही नागरिकांना दिसले होते. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संजयच्या घराची पाहणी केली. तेव्हा भिंतीवर काही निशाण आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा