करजगावात धूर फवारणीचा मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:57+5:302021-09-19T04:13:57+5:30
करजगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूने विश्रांती घेतली असली तरी सध्या डेंग्यू या आजाराने चांगलेच हात पाय पसरले आहे. मृत्युमुखी ...

करजगावात धूर फवारणीचा मुहूर्त मिळेना
करजगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूने विश्रांती घेतली असली तरी सध्या डेंग्यू या आजाराने चांगलेच हात पाय पसरले आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. त्यापासून वाचण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी करजगाव ग्रामपंचायत प्रशासनाला धूर फवारणीचा अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता धूर फवारणीसाठी वारंवार पुढील तारखा सांगितल्या जातात. धूर फवारणीकरिता वापरली जात असलेली फॉगिग मशीन गतवर्षीच खरेदी केली होती. ती एका वर्षात साधारणतः दोन ते तीन फवारणीनंतर बिघडली कशी, याची चर्चा सुरू आहे. अद्याप पर्यायी व्यवस्था करणे वा नवीन मशीन खरेदी करण्याचे शहाणपण ग्रामपंचायतला सुचलेले नाही. विशेष म्हणजे, ग्रामसचिव किशोर उल्हे हे मुख्यालयी राहत असल्याचे पुरावे देऊन घरभाड्याची रक्कम शासनाकडून लाटतात. मात्र, गावात राहत नाहीत तसेच त्यांच्याशी संपर्कही कधी-कधी होत नाही. या गंभीर बाबीकडे चांदूर बाजार पंचायत समितीच्या नव्याने रुजू झालेल्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.