महापालिकेत एक प्रभाग -एक सदस्य प्रणालीच हवी

By Admin | Updated: May 26, 2016 01:13 IST2016-05-26T01:13:25+5:302016-05-26T01:13:25+5:30

महानगरपालिका निवडणूकीसाठी बहुसदस्यीय प्रणाली ऐवजी एक प्रभाग एक सदस्य ही प्रणाली ठेवण्यात यावी, ...

There is a ward in Municipal Corporation - one member system | महापालिकेत एक प्रभाग -एक सदस्य प्रणालीच हवी

महापालिकेत एक प्रभाग -एक सदस्य प्रणालीच हवी

रिपाइं आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : महानगरपालिका निवडणूकीसाठी बहुसदस्यीय प्रणाली ऐवजी एक प्रभाग एक सदस्य ही प्रणाली ठेवण्यात यावी, अशी आग्रही मागणी रिपाइंची जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
२०१७ ला राज्यातील १० महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पध्दतीने निवडणुका घेण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. ही बाब छोटया पक्षांना व प्रभागातील समाजसेवकांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुका या एक प्रभाग, एक सदस्य या पध्दतीनेच घेण्यात याव्या यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे घोषित आंदोलनाचा भाग म्हणून आज निवेदन देण्यात आले. एक सदस्यीय प्रणालीत बंडखोरी वाढते व अपक्ष निवडून येतात हे या मागचे कारण सांगितले जाते तर दुसरीकडे ५० टक्के महिला आरक्षण झाल्याने प्रभागात महिला व पुरुषांना लढता यावे, म्हणून द्विसदस्यीय आणली २०१२ च्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळत नाही त्यांनाही ती मिळावी या हेतूने चार सदस्यांचा एक प्रभाग या पध्दतीने निवडणुका घेण्यात याव्या या मागचे सुत्र आहे. प्रभागाच्या सिमा या वाढल्याने नगर सेवकांना मर्यादित विकास निधीमध्ये मोठी लोकसंख्या असलेल्या प्रभागाचे विकासाचे नियोजन करणे अशक्य होते शिवाय प्रभागात एकाच विचाराचे वा पक्षाचे नगर सेवक निवडून येत नसल्याने वार्डाचा विकास हा सहमती शिवाय खोळंबतो. अमरावती महापालिकेत महापौरांचा वार्ड असो की सत्तधारी भाजपचा साई नगर प्रभाग असो किंवा अन्य प्रभाग असो यासर्व प्रभागात एकाही नगरसेवकाचे दुसऱ्या नगरसेवकाशी पटत नाही. त्याशिवाय विकास निधी खेचून आणतो एक तर त्याचे श्रेय घेतो दुसरा असे सर्व चित्र आहे. त्यामुळे जर चार सदस्यीय प्रभाग झाल्यास वार्ड विकास हा वाऱ्यावर पडणार आहे. ज्या मतदारांना विकास त्यांचे मत या प्रणालीत घेतल्या जात नाही. तेव्हा महानगरपालिकेच्या नगरसेवकांचेही मत जाणून न घेणे तसेच प्रशासनाला येणाऱ्या अडचणी काय?या विचारात न घेता सरळसरळ राज्य सरकारकडे तो विषय असल्याने राज्य सरकारला वाटेल त्या पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नवनवीत प्रयोग करणे ही बाब चुकीचे असल्याचे दंदे यांनी म्हटले आहे. निवेदन देतेवेळी माजी आ.अनिल गोंडाणे, रिपाइंच्या विभागीय चिटणीस महेंद्र भालेकर, गजानन वानखडे, ओमप्रकाश बन्सोड, सुनील रामटेके, आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: There is a ward in Municipal Corporation - one member system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.