शहरभर कडेकोट बंदोबस्त, तरीही दोघांवर सशस्त्र हल्ला

By Admin | Updated: August 31, 2014 23:28 IST2014-08-31T23:28:30+5:302014-08-31T23:28:30+5:30

गणेशोत्सवादरम्यान शहरात एकीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असताना दुसरीकडे अज्ञात हल्लेखोरांनी एकाच रात्री दोन जणांवर सशस्त्र हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले.

There is a tight security in the city, yet there is an armed attack on both sides | शहरभर कडेकोट बंदोबस्त, तरीही दोघांवर सशस्त्र हल्ला

शहरभर कडेकोट बंदोबस्त, तरीही दोघांवर सशस्त्र हल्ला

अमरावती : गणेशोत्सवादरम्यान शहरात एकीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असताना दुसरीकडे अज्ञात हल्लेखोरांनी एकाच रात्री दोन जणांवर सशस्त्र हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. कोतवाली पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर जयस्तंभ चौक व मालवीय चौकात शनिवारी रात्री या घटना घडल्यात. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ब्रह्मदत्त रामनारायण शर्मा (६०, रा. सतिधाम मार्केट) व कुणाल ओंकार राऊत (२५,रा. पार्वतीनगर) अशी जखमींची नावे आहेत.
ब्रह्मदत्त शर्मा यांचे मालवीय चौकात इलेक्ट्रीक वस्तू विक्रीचे दुकान आहे.
रविवारी रात्री ९ वाजता ते दुकानात टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघत होते. तेथे एम.एच.३१ बी.३०८५ या दुचाकीवर तीन अज्ञात इसम आले. यापैकी दोघे दुकानात शिरले.

Web Title: There is a tight security in the city, yet there is an armed attack on both sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.