मुंबईकडे जाणाऱ्या मेलमध्ये एकही आरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:15+5:30

रेल्वे बोर्डाने मेल, एक्स्प्रेस अशा लांब पल्ल्याच्या १०० रेल्वे गाड्या पहिल्या टप्प्यात १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता हावडा-मुंबई मेल पोहोचली. मात्र, या रेल्वे गाडीने मुंबईकडे जाण्यासाठी एकाही प्रवाशाचे बडनेऱ्यातून आरक्षण नव्हते. या रेल्वे गाडीने उतरलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली.

There is no reservation in the mail to Mumbai | मुंबईकडे जाणाऱ्या मेलमध्ये एकही आरक्षण नाही

मुंबईकडे जाणाऱ्या मेलमध्ये एकही आरक्षण नाही

Next
ठळक मुद्देबडनेऱ्यात दोन रेल्वे गाड्यांना थांबा : अहमदाबादकडे ४० प्रवाशांचे आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : लॉकडाऊनमुळे दोन महिन्याच्या कालावधीनंतर मंगळवारी पहिल्यांदाच धावणाऱ्या हावडा-मुंबई मेलमध्ये बडनेरा रेल्वे स्थानकाहून एकाही प्रवाशाचे आरक्षण नव्हते. जिल्हावासीयांनी मुंबईकडे रेल्वे प्रवास करण्याचे टाळले, हे विशेष. मात्र, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसने ४० जणांचे आरक्षण होते, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे बोर्डाने मेल, एक्स्प्रेस अशा लांब पल्ल्याच्या १०० रेल्वे गाड्या पहिल्या टप्प्यात १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता हावडा-मुंबई मेल पोहोचली. मात्र, या रेल्वे गाडीने मुंबईकडे जाण्यासाठी एकाही प्रवाशाचे बडनेऱ्यातून आरक्षण नव्हते. या रेल्वे गाडीने उतरलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. बडनेरा रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणी, आरक्षण यादी, डब्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी महसूल, रेल्वे विभागाचे अधिकारी तळ ठोकून होते. सुरक्षेच्या अनुषंगाने रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस सज्ज होते. हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी बडनेरा रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांना पोहोचते. या रेल्वे गाडीतून ४० प्रवाशांचे आरक्षण आहे.
जिल्ह्याबाहेरून प्रवासी येणार असल्याने बडनेरा रेल्वे स्थानकाचा परिसर सॅनिटाइज करण्यात आला होता. मास्क व सोशल डिस्टंसिंगवर प्रशासनाचे विशेष लक्ष होते. प्रवाशांच्या साहित्याचे सॅनिटायझेशन करण्यात आले. रेल्वे स्थानकावर नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, महापालिका उपायुक्त विजय खोराटे, तहसीलदार संतोष काकडे, आरोग्य अधिकारी विशाल काळे, स्थानक प्रबंधक पी.के. सिन्हा, वाणिज्य निरीक्षक शरद सयाम, व्ही.एस. चारदेवे, आरपीएफचे बी.एस. नरवार, रेल्वे पोलीस व सुरक्षा बल तैनात होते.

बडनेऱ्यात मेलने आले सात प्रवासी
बडनेरा रेल्वे स्थानकावर हावडा-मुंबई मेल ही रेल्वे गाडी सायंकाळी ५ वाजून ५२ मिनिेटांनी पोहोचली. तीन मिनिटांच्या थांब्यानंतर ५ वाजून ५५ मिनिटांनी मुंबईकडे रवाना झाली. या रेल्वे गाडीतून बडनेरा रेल्वे स्थानकावर सात प्रवासी उतरलेत. या सर्व प्रवाशांची महापालिका आरोग्य विभागाकडून थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. ताप, सर्दी, खोकला व घशाच्या श्वसनाबाबत तपासणी करून सातही प्रवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर पाठविण्यात आले.

Web Title: There is no reservation in the mail to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे