अवैध शस्त्र बाळगणाºयांची आता खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:03 IST2017-12-26T01:02:49+5:302017-12-26T01:03:02+5:30
चाकू, तलवार, देशी कट्ट्यासारखे शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाºयांवर अंकूश बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने सोमवारपासून शहरात विशेष मोहिम राबविण्यात आली.

अवैध शस्त्र बाळगणाºयांची आता खैर नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चाकू, तलवार, देशी कट्ट्यासारखे शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाºयांवर अंकूश बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने सोमवारपासून शहरात विशेष मोहिम राबविण्यात आली. विविध चौकांमध्ये टप्प्या-टप्प्याने नाकाबंदी करून तब्बल दिडशेवर वाहनचालकांची अंगझडती घेण्यात आली. पोलिसांनी रात्री ९ वाजेपर्यंत १९ दुचाकी डिटेन करून एका संशयीतास ताब्यात घेतले होते.
या विशेष नाकाबंदीसाठी पोलीस आयुक्तांनी कोतवाली, नागपूरी गेट, गाडगेनगर व वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना सुचना दिल्या. त्यानुसार सायंकाळपासून नाकाबंदी सुरु झाली. एका पाईन्टवर अर्धा तासात थांबवून पोलिसांनी वाहनाचालकांची व वाहनांची कसून तपासणी केली. वाहनचालकाच्या अंगझडतीत शस्त्र आहे का, याकडे पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. या नाकाबंदीसाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदिप चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, पोलीस निरीक्षक अजय मालवीय, अर्जुन ठोसरे, दिलीप पाटील, दिलीप चव्हाण, मनीष ठाकरे यांच्यासह क्युआरटी पथक रस्त्यावर उतरले होते.