प्रजाकसत्ताक दिनीही जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:10+5:302021-02-05T05:26:10+5:30

अमरावती : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. परंतु, सन २०१९-२० चे जिल्हा ...

There is no District Ideal Teacher Award Ceremony even on Republic Day | प्रजाकसत्ताक दिनीही जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा नाही

प्रजाकसत्ताक दिनीही जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा नाही

अमरावती : दरवर्षी जिल्हा परिषदेकडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. परंतु, सन २०१९-२० चे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अद्याप देण्यात आले नाहीत. प्रजासत्ताक दिनी शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, पुरस्कार वितरणाचा मुहूर्त निघाला नाही. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांकडे याबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी प्रदान

करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाने ३ जानेवारी २०२१ हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. या दिवशी पुरस्कार वितरण करण्याची मागणी शिक्षक समिती केली होती. परंतु, विभागीय आयुक्त कार्यालयातून यादीला मंजुरी मिळाली नव्हती. आता यादीला मंजुर मिळाली असून, प्रजाकसत्ताक दिनी तरी पुरस्काराचे वितरण करावे, अशी मागणी असतानाही ती मान्य झालेली नाही. प्राथमिक शिक्षक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पुरस्कार वितरणाचे आयोजनाचे काम प्राथमिक शिक्षण विभागाचे आहे. शिक्षण क्षेञात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना ५ सप्टेंबरला दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीलासुद्धा मिळले नाही. आता २६ जानेवारीला तरी मिळतील, ही आशा होती. मात्र, तीही पूर्ण झाली नसल्याने पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. यात १४ प्राथमिक व एका माध्यमिक शिक्षकाचा समावेश आहे.

बाॅक्स

निवड झालेले शिक्षक

प्राथमिक विभाग : बबलू कराडे (अचलपूर), शहाजहाँ परवीन मो. याकुब (अमरावती), वैशाली सरोदे (अंजनगाव सुर्जी), लखन जाधव (भातकुली), मंगेश वाघमारे (चांदूर बाजार), मनोज वानखडे (चांदूर रेल्वे), वैजनाथ इप्पर (चिखलदरा), उमेश आडे (धामणगाव रेल्वे), किशोर बुरघाटे (दर्यापूर), योगिता भुमर (धारणी), प्रियंका काळे (मोर्शी), अहमद खान पटेल (नांदगाव खंडेश्वर), सचिन विटाळकर (तिवसा), नंदकिशोर पाटील (वरूड). माध्यमिक विभाग : किशोर इंगळे (अमरावती).

Web Title: There is no District Ideal Teacher Award Ceremony even on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.