उद्योगांच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम हवेत

By Admin | Updated: May 16, 2016 00:08 IST2016-05-16T00:08:54+5:302016-05-16T00:08:54+5:30

इतर विद्यापीठाच्या तुलनेत विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची व केलेल्या कामाचे सादरीकरण करण्याची कमतरता भासते.

There is a need for courses as per the requirement of industry | उद्योगांच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम हवेत

उद्योगांच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम हवेत

पालकमंत्री : विद्यापीठात इमारतीचे लोकार्पण
अमरावती : इतर विद्यापीठाच्या तुलनेत विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची व केलेल्या कामाचे सादरीकरण करण्याची कमतरता भासते. या दोन गोष्टींची उणीव विद्यापीठाने भरून काढावी व उद्योग व्यवसायास लागणारे कुशल कामगार पुरवठा करण्यासाठी गरजेप्रमाणे अभ्यासक्रम सुरू करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन ना.पोटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू विलास सपकाळ, प्रमुख पाहुणे म्हणून खा. आनंदराव अडसूळ, आ.श्रीकांत देशपांडे, कुलसचिव र.जे. देशमुख, परीक्षा निरीक्षक वडते, संचालक आर.एस. सपकाळ, संदीप जोशी, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, कार्यकारी अभियंता वैद्य आदी उपस्थित होते.
विदर्भात इंग्रजी भाषेचा तसेच प्रेझेंटेशनची कमतरता आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकासावर भर दिला आहे. यासाठी विद्यापीठाने कौशल्य विकासासाठी अभ्यासक्रम सुरू करावे, असे पोटे म्हणाले. विद्यापीठ सक्षमपणे कार्य करते. अमरावतीत टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योग येत आहेत. त्यांना लागणारे कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अभ्यासक्रम सुरू करावेत. प्रत्येक जिल्ह्याला कौशल्य विकासाचे केंद्र मिळणार असल्यामुळे विद्यापीठाने लक्ष द्यावे, असे खा. अडसूळ म्हणाले.
विद्यापीठाच्या दर्जावाढीत के.जी. देशमुखांचे मोठे योगदान आहे. विद्यापीठाचा प्रशस्त, निसर्गरम्य परिसर व उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांचे कौतुक आ. श्रीकांत देशपांडे यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने अमरावती येथे क्लस्टरर्स व इंडस्ट्रीज येत आहे. यातून स्पर्धा वाढीस लागणार असल्याने कौशल्य विकासावर भर आहे. विद्यापीठात कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे सांगून, विद्यापीठास अ श्रेणीचा दर्जा प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरु सपकाळ यांनी दिली.

Web Title: There is a need for courses as per the requirement of industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.