शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठ अधिनस्थ एकाही महाविद्यालयात आदिवासी प्राचार्य नाही

By गणेश वासनिक | Updated: November 15, 2022 16:59 IST

नव्या शासन निर्णयानंतरही स्थिती जैसे थे, २७८ महाविद्यालयात प्राचार्याचा प्रभारी कारभार

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठ संलग्नित ३९७ पैकी एकाही महाविद्यालयात आदिवासी संवर्गातील प्राचार्य नसल्याची धक्कादायक माहिती आहे. प्राचार्य पदासाठी पात्र आदिवासी उमेदवार मिळत नसल्याने संबंधित महाविद्यालयात प्रभारी कारभार हाकला जातो. 

अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा व अकोला या पाचही जिल्ह्यात एकाही महाविद्यालयात आदिवासी समाजातील व्यक्ती प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आली नाही. राज्य शासनाच्या उच्च व शिक्षण विभागाने एकापेक्षा जास्त महाविद्यालये असलेल्या संस्थांना प्राचार्य पदासाठी आरक्षण लागू केले आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठ संलग्नित सुमारे ३९७ महाविद्यालये असून, यापैकी एकाही महाविद्यालयात आदिवासी प्राचार्य नियुक्त करण्यात आले नाही.

अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयात अशोक उईके यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पुढे डॉ. अशोक उईके हे आमदार झाले आणि त्यांना प्राचार्य पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून शिवाजी शिक्षण संस्थेच्या एकाही महाविद्यालयात आदिवासी समाजातील शैक्षणिक पात्रता असलेली व्यक्ती प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली नाही. अमरावती विभागातील ३९७ महाविद्यालयात हीच स्थिती आहे. शासनाने प्राचार्य पदासाठी महाविद्यालयांना रोस्टर लागू केले असले तरी पात्र व्यक्ती मिळत नसल्याने संस्था चालकांना प्राचार्य पदाचा प्रभारी कारभार चालवावा लागतो, हे विशेष.

२७८ महाविद्यालयात प्राचार्यपदाचा ‘प्रभारी’ कारभार 

अमरावती विद्यापीठ संलग्नित अनुदानित वा विना अनुदानित अशा ३९७ पैकी २७८ महाविद्यालयात कायम स्वरूपी प्राचार्य नाही. त्यामुळे संस्था चालकांना वरिष्ठ प्राध्यापकांकडे प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवावी लागते. ११९ महाविद्यालयात प्राचार्याची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयानुसार प्राचार्य पदासाठी ओबीसी, एससी, एसटी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र, ओबीसी, एससी संवर्गातील पात्र व्यक्ती प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यास वाव आहे. तथापि, एसटी संवर्गातील प्राचार्य पदासाठी पात्र व्यक्ती मिळत नसल्याचे वास्तव आहे.

महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि रोस्टरनुसार त्या संवर्गातील प्राचार्य पदावर व्यक्तीची निवड होणे अनिवार्य आहे. त्यानुसार संस्थाचालक आणि सचिवांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अमरावती विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी पात्र आदिवासी न मिळणे ही बाब योग्य नाही.

- डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च व शिक्षण, अमरावती विभाग

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAmravatiअमरावतीProfessorप्राध्यापक