शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

...तर उद्धव ठाकरे 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे अध्यक्षही होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:06 IST

Amravati : चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उद्धव ठाकरे यांचे नाशिक, परभणी व धाराशिवमध्ये खासदार निवडून आले, तेव्हा त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडविले. मतांच्या लांगुलचालनासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे सदस्य झाल्याचे मी म्हटले होते. पुढच्या काळात ते या क्लबचे अध्यक्ष होतील, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. 

ज्या दिवशी काँग्रेससोबत जावे लागेल, त्या दिवशी मी माझ्या शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी हिंदू धर्माचा, भगव्या ध्वजाचा विचार सोडला. संजय राऊत यांचे बोलणे मला ऐकू येत नाही व महाराष्ट्रातील जनतेनी त्यांचे ऐकणे सोडले आहे. त्यामुळे संजय राऊत या विषयावर बोलण्यात काही अर्थ नसल्याचे बावनकुळे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या वडिलांनी तक्रार नोंदविली आहे, जोपर्यंत पोलिस अंतिम निष्कर्षावर येत नाहीत, तोपर्यंत या विषयावर बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते.

रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच निकालीसन २०४७ पर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला राज्यात व देशात वाव नाही. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षातच राहावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देत असल्याचे बावनकुळे म्हणाले. रायगड येथील पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांची लवकरच बैठक होणार आहे. मीही बैठकीत असणार आहे. अधिवेशनामुळे बैठक लांबल्याचे ते म्हणाले. संभाजी भिडे व प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटले, यापेक्षा देशाचा इतिहास, संस्कृती काय म्हणते, ते महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AmravatiअमरावतीChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे