काळगव्हाण येथे तीन घरांत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST2021-02-10T04:13:19+5:302021-02-10T04:13:19+5:30

तक्रारकर्ते अब्दुल साजिद यांच्या पत्नीला ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली असता, सोन्याचे दागिने ठेवलेला डबा खाली ...

Theft in three houses at Kalagavan | काळगव्हाण येथे तीन घरांत चोरी

काळगव्हाण येथे तीन घरांत चोरी

तक्रारकर्ते अब्दुल साजिद यांच्या पत्नीला ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली असता, सोन्याचे दागिने ठेवलेला डबा खाली पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अ. साजिद हेदेखील जागे झाले. घरातील आलमारी उघडी होती. त्यातील लॉकर सताड उघडे दिसले. त्यातून ५० हजार रुपये रोख व पाच ग्रॅम वजानाची सोन्याची पोत असा एकूण १ लाख ७५० रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याच वेळी गावातील तस्लीम खान सुलेमान खान यांच्या घरातील टिनाच्या पेटीचे कुलूप तोडून त्यातील २३ हजार रुपये रोख पळविण्यात आल्याचे लक्षात आले. शेख खालिद शेख रहमान यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले अंदाजे दहा हजार रुपयेदेखील अज्ञात चोरांनी लांबविले. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Theft in three houses at Kalagavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.