असदपूर परिसरातील नद्यांमधील रेतीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:30 IST2020-12-12T04:30:01+5:302020-12-12T04:30:01+5:30
असदपूर : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी आल्यामुळे नद्यांना बरेच पूर आले. त्यामुळे रेतीसाठा बऱ्यापैकी जमा झाला. परंतु अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे ट्रॅक्टरद्वारे ...

असदपूर परिसरातील नद्यांमधील रेतीची चोरी
असदपूर : यावर्षी पाऊस बऱ्यापैकी आल्यामुळे नद्यांना बरेच पूर आले. त्यामुळे रेतीसाठा बऱ्यापैकी जमा झाला. परंतु अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे ट्रॅक्टरद्वारे व शेकडो गाढवांद्वारे दररोज लाखो रुपयांची रेती चोरीला जात असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
मागील वर्षीसुद्धा कोट्यवधींची रेती चोरीला गेली होती. या रेती चोरट्यांना आळा बसावा म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे व अनेक शिवसैनिकांनी सापन नदीपात्रात उपोषणही केले होते. याहीवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेती चोरट्यांवर कार्यवाही करून रेती चोरी थांबवावी. तसेच या रेतीचा लिलावसुद्धा करण्यात यावा. रेती चोरट्यांना आळा न बसल्यास शिवसेना जिल्हाप्रमुखांसहीत शेकडो शिवसैनिक नदीपात्रात बेमुदत उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.