नवाथेनगरातील राजलक्ष्मी मेडिकलमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:00+5:302021-04-05T04:12:00+5:30
अमरावती : नवाथेनगरातील राजलक्ष्मी मेडिकलचे शेटर वाकवून सात हजार रुपये रोख व औषधी लंपास केल्याची घडली. श्रीकांत राजेंद्र ...

नवाथेनगरातील राजलक्ष्मी मेडिकलमध्ये चोरी
अमरावती : नवाथेनगरातील राजलक्ष्मी मेडिकलचे शेटर वाकवून सात हजार रुपये रोख व औषधी लंपास केल्याची घडली. श्रीकांत राजेंद्र नवाथे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी २५ ते ३० वयोगटातील दोन इसमाविरुध्द गुन्हा नोंदविला.
श्रीकांत नवाथे हे २ एप्रिल रोजी रात्री मेडिकल बंद करून घरी गेले. त्यानंतर ३ एप्रिल रोजी सकाळी मेडिकलचे सुरक्षा रक्षक हरिभाऊ राव यांना शटर वाकलेले दिसले. त्यांनी श्रीकांत यांना कळविले. त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन पाहणी केली असता, चोरांनी शेटर वाकवून औषधी व गल्ल्यातील रोख चोरल्याचे आढळून आले. श्रीकांत यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरट्यांनी औषधी व काऊन्टरमधील पैसे काढताना दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
000000000000000000000000000000000
वाहतुकीस अडथळा करणाऱ्या भाजी विक्रेत्यावर गुन्हा
अमरावती : सार्वजनिक रस्त्यावर भाजीपाल्याची हातगाडी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने कोतवाली पोलिसांनी शनिवारी किरकोळ भाजीपाला विक्रेत्याविरुध्द गुन्हा नोंदविला. फकिरा भीमराव माहुरे (४२ रा. बुधवारा) असे आरोपीचे नाव आहे.