विपुल ज्वेलर्समध्ये ४४ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:57+5:302021-03-10T04:14:57+5:30
बुरखाधारी महिला : सीसीटीव्ही कॅमेरात कैद अंजनगांव सुर्जी : दुकानात गर्दी असल्याचे पाहून एका बुरखाधारी महिलेने दुकानातील ईअर रिंगचा ...

विपुल ज्वेलर्समध्ये ४४ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी
बुरखाधारी महिला : सीसीटीव्ही कॅमेरात कैद
अंजनगांव सुर्जी : दुकानात गर्दी असल्याचे पाहून एका बुरखाधारी महिलेने दुकानातील ईअर रिंगचा जोड चोरून नेल्याची घटना येथील विपुल ज्वेलर्समध्ये घडली. ८ मार्च रोजी दुपारी १२ नंतर हा प्रकार उघड झाला. अज्ञात बुरखाधारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सोनार लाईनमध्ये सतीश लोणकर यांचे विपुल ज्वेलर्स आर्ट हे सराफा प्रतिष्ठान आहे. सोमवारी दुपारी १ वाजता त्यांना स्ट्रेमध्ये एक ईअर रिंग कमी असल्याचे आढळून आल्यावर त्यांनी शोध घेतला. परंतु, नऊ ग्रॅमचा तो जोड कुठेही आढळून आला नाही. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. त्यात १२.१७ ते १२.२५ दरम्यान बुरखा घातलेली एक महिला दुकानात येऊन तिने ईअर रिंग बघितल्याचे आणि दुकानात काम करणाऱ्या महिलेची नजर चुकवून ती बुरख्यात लपवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत ४४ हजार रुपये आहे. सतीश लोणकर यांनी याबाबतची तक्रार अंजनगाव पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविचे ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.