बांधकाम स्थळावरील साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST2021-06-04T04:10:50+5:302021-06-04T04:10:50+5:30

0000000000000000000000000000 वलगावातून तरुणाची दुचाकी लंपास अमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील जय अंबे मेडिकल स्टोअर्सजवळून एका तरुणाची दुचाकी चोराने लंपास ...

Theft of construction materials | बांधकाम स्थळावरील साहित्याची चोरी

बांधकाम स्थळावरील साहित्याची चोरी

0000000000000000000000000000

वलगावातून तरुणाची दुचाकी लंपास

अमरावती : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील जय अंबे मेडिकल स्टोअर्सजवळून एका तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. रंगनाथ श्रीकृष्ण नान्हे (१९ रा. धानोरा पूर्णा, ता. चांदूर बाजार) यांनी एमएच २७ बीडी ३०३७ या क्रमांकाची दुचाकी जय अंबे मेडिकल स्टोअर्सजवळ उभी केली होती. तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

0000000000000000000000

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

अमरावती: बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील गांधी विद्यालयामागील पुलाजवळ बुधवारी एका ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताची ओळख अद्याप पटली नसून पोलीस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.

0000000000000000000000000

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

अमरावती: गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बडनेरातील जुनीवस्ती स्थित माता फैल परिसरात बुधवारी उघडकीस आली.

गोपाल माताप्रसाद कैथवास (३० रा. बडनेरा) असे मृताचे नाव आहे. बबलु गंगाराम यादव (४४ रा. माताफैल, बडनेरा) यांच्या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली.

Web Title: Theft of construction materials