शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ विभागात तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना

By गणेश वासनिक | Updated: October 1, 2023 14:28 IST

मनमाड-जळगाव-भुसावळ नवीन तिसरी लाईन; १३६०.१६ कोटींचा खर्च अपेक्षित,

अमरावती: मध्य रेल्वे भुसावळ विभागात मनमाड-जळगाव-भुसावळ या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्य युद्धस्तरावर सुरूआहे. या तिसऱ्या मार्गामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत होणार असून, मालगाडी वाहतुकीला नवा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना टाळता येणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई मध्य रेल्वे विभागाने नागपूर ते मुंबई या दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्याअनुषंगाने नागपूर ते वर्धा या दरम्यान काही प्रमाणात तिसऱ्या मार्गाचे काम झाले आहे. काही ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होत आहे. मनमाड-जळगाव-भुसावळ या दरम्यान एकूण १८३.९५ किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग टाकला जात आहे. त्याकरिता १३६०.१६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत १२८६.७५ कोटी खर्च करण्यात आले आहे. एकूण कामांची भौतिक प्रगती ८० टक्के एवढी झालीआहे.

या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत २८.१९/३७.०८ हेक्टर जमीन संपादन पूर्ण झाले आहे. चाळीसगाव-पिंपरखेड या ३१.७९ किमी लांबीचा मार्ग या वर्षात पूर्ण होण्याचे शक्यता आहे. पाचोरा -चाळीसगाव आणि नांदगाव -पिंपरखेड या दरम्यान ५५.३४ किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्गाचे कार्य प्रगतीपथावर आहे.९६.८१ किमी लांबीचे पूर्ण झालेले विभागभुसावळ - जळगावजळगाव - पाचोरामनमाड - नांदगावआतापर्यंत पूर्ण झालेली कामेमाती कामे, ब्लँकेटिंग, प्रमुख पूल, छोटे पूल, स्टेशन इमारती, ट्रॅक लिंकिंग, गिट्टी पुरवठा, ओएचई फाउंडेशन, मास्ट इरेक्शन, विद्युतीकरण- ट्रॅकच्या कामासह एकाच वेळी प्रगतीपथावर असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी मानसपुरे यांनी सांगितले.

टॅग्स :AmravatiअमरावतीJalgaonजळगाव