शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट

By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 20:54 IST

५२ दिवसानंतर तिढा सुटला:पोषण आहाराचे वाटप सुरळीत.

अमरावती: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उभारलेला संप मिटला असून जिल्ह्यातील सर्व ५२ दिवसानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिस कामावर शनिवारपासून कामावर परतल्या आहेत. त्यामुळे अडीच हजारावर अंगणवाडी केंद्र उघडले असून अंगणवाडी केंद्राची मुले आलेले असून त्यांना आहार वाटप करण्यात आलेला आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पुन्हा किलबिलिट सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ४ डिसेंबरपासून शासकीय सेवेत कायम करण्यासाठी मानधनवाढीच्या मागण्यासाठी संप पुकारला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील २६४६ अंगणवाडीतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व अंगणवाड्या बंद होत्या. अखेर ५२ दिवसांनंतर गुरुवार २५ जानेवारी रोजी मुंबई येथे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युईटीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय तसेच नवीन मोबाईल देण्याची मागण्या मान्य करण्यात आला. तर मानधनवाढीसंदर्भात पुढे चर्चा करण्यात येणार आहे.दरम्यान यावर अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे समाधान झाल्याने तूर्तास कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महाराष्ट्र अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)चे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका,मदतनिसाच्या संपाकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघाल्याने शनिवारपासून जिल्ह्यातील २ हजार ६४६ अंगणवाड्याचे टाळे उघडले आहेत.परिणामी जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी केंद्रात चिमुकल्याचा ५२ दिवसानंतर किलबिलाट सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आता चिमुकल्यांना नियमित पोषण आहारअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तब्बल ५२ दिवस चालले. त्यामुळे एवढे दिवस अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागले होते. मात्र आंदोलन मागे झाल्याने शनिवारपासून चिमुकल्यांना नियमित पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन सुरुवातीपासूनच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सकारात्मक होते. संप बरेच दिवस सुरू होता. परंतु आता अंगणवाडी सेविकांचा संप मिटल्यामुळे अंगणवाडी केंद्र पूर्ववत सुरू झाल्या आहेत-डॉ.कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती