शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती बंड यांच्या पाठीशी ऑटो संघटनेचे बळ, जाहीर पाठिंबाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 11:41 IST

Amravati : बडनेरातील चालक दाखवणार ताकद; नितीन मोहोड यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रीती संजय बंड यांना ऑटो संघटनेने रविवारी आयोजित सभेद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बंड यांची उमेदवारी भक्कम झाली असून, त्यांना ऑटो संघटनेचे बळ हे आता मतदारसंघात नवा आयाम देणार असल्याची खात्री ऑटो संघटनेचे सर्वेसर्वा नितीन मोहोड यांनी यावेळी दिली.

बडनेरा मार्गावरील जाधव पॅलेस येथे ऑटो संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची सभा रविवारी पार पडली. या सभेत एकमुखाने बंड यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय ऑटो संघटनेने घेतला. अवघ्या काही दिवसांतच प्रचाराची आघाडी घेतलेल्या प्रीती संजय बंड यांच्या पाठीशी जनसामान्यांची ताकद मोठ्या प्रमाणात उभी होताना दिसत आहे. प्रीती बंड जनसामान्यांची शक्ती आणि गेल्या १५ वर्षांत बडनेरा मतदारसंघाच्या झालेल्या परिस्थितीचा विचार करता, ऑटो संघटनेने प्रीती बंड यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. बडनेरा मतदारसंघातील ऑटो चालक आपली ताकद दाखवून देणार, असे आश्वासन ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. प्रीती बंड यांनी ऑटो संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या सभेला ऑटो संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड, संतोष शेरेकर, संतोष भंडारकर, अब्दुल अशफाक, संतोष सोनटक्के, पंकज सूर्यवंशी, बाळू सखे यांच्यासह संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत नाना नागमोते, उमेश घुरडे, अनिल सोनटक्के, डॉ. अल्वीना हक, बाबा राठोड, जितू ठाकूर, विभा गौरखेडे आदी उपस्थित होते. 

आजपासून 'ऑटो'च्या प्रचाराला लागू : नितीन मोहोड प्रीती बंड यांच्या पाठीशी बडनेरा मतदारसंघातील जनशक्त्ती मोठ्या प्रमाणात उभी आहे. त्यामुळे आम्ही प्रीती बंड यांना जाहीर पाठिंबा देत आहे. प्रीती बंड यांचे 'ऑटो' हे बोधचिन्ह असून, सोमवारपासून आम्ही 'ऑटो रिक्षा'चा प्रचार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी सांगितले.

रवी नगर येथे प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद अपक्ष उमेदवार प्रीती संजय बंड यांच्या प्रचारार्थ रविवारी व्यापक जनसंपर्क अभियान रवी नगर भागात राबवून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर येथून प्रचार अभियान सुरू होत पुढे महेश्वर मंदिर, राम मंदिर, गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर परिसर, छांगाणी नगर, न्यू छांगाणी नगर, न्यू रवी नगर, न्यू गणेश कॉलनी, अंबा विहार, पार्वती नगरमार्गे महेश नगर येथे समारोप झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amravatiअमरावती