शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकींसाठी राज्य शासनाकडे वेळ नाही; १२ वर्षांत केवळ पाच बैठका

By गणेश वासनिक | Updated: November 25, 2022 17:51 IST

माहिती अधिकारात वास्तव उघड

अमरावती : भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचीनुसार आदिवासी सल्लागार परिषदेच्या वर्षातून किमान चार बैठका होणे अनिवार्य आहे. तथापि, आधीचे महाविकास आघाडी सरकार तसेच आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने एकही बैठक घेतली नाही. गत १२ वर्षांत राज्य सरकारने केवळ पाच बैठका घेतल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे आदिवासींच्या उत्थानासाठी स्थापित जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकांसाठी शासनाकडे वेळ नाही, असे म्हणण्याचा प्रसंग ओढवला आहे.

भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीतील भाग- ख मधील परिच्छेद ४ (१) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना, धोरण, कार्यक्रमाचे नियमन आणि आदिवासींच्या विकासाच्या संदर्भातील विचारलेल्या विषयांच्या बाबतीत राज्यपालांना सल्ला देण्याकरिता जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे. या संदर्भात सदानंद नुऱ्या गावित यांनी माहिती अधिकारात अर्ज सादर केला होता.

१ जानेवारी २०१० पासून ते २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत जनजाती सल्लागार परिषदेच्या केवळ पाचच बैठका झालेल्या आहेत. यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आले. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही बैठक झाली नाही. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून राज्यात आता शिंदे-फडणवीस नवीन सरकार आले आहे. तरी आदिवासी समाजाचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्गठनही करण्यात आले नाही व एकही बैठक घेण्यात आलेली नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. या जनजाती सल्लागार परिषदेत राज्यातील आदिवासी आमदार, खासदार व आदिवासीसंबंधी तज्ज्ञांचा समावेश असतो.

अशा घेण्यात आल्या बैठका

१) ४६ वी - ३१ ऑगस्ट २०१२२) ४७ वी - ४ जानेवारी २०१२३) ४८ वी - १४ फेब्रुवारी २०१४४) ४९ वी - ६ मार्च २०१६५) ५० वी - ११ फेब्रुवारी २०१९राष्ट्रीय जनजाती आयोगाने २०१२ च्या अहवालात सूचना केल्यानुसार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्गठन अनिवार्य आहे. वर्षातून किमान चार बैठका झाल्या पाहिजेत; मात्र, १२ वर्षांत आजपर्यंत ४८ बैठका व्हायला पाहिजे होत्या. बैठकाच नाहीत; त्यामुळे आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक-अध्यक्ष, ट्रायबल फोरम, महाराष्ट्र

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावतीState Governmentराज्य सरकार