शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अब की बार, चौऱ्यांशी पार; वृद्धाने उडविला लग्नाचा बार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:15 IST

Amravati : बुधवारी बोहल्यावर चढले विठ्ठल खंडारे व इंदूबाई हे नवदाम्पत्य.

लोकमत न्यूज नेटवर्कवनोजा बाग/अंजनगाव सुर्जी : चौऱ्यांशी वर्षांच्या उपवरासाठी त्याच्या कुटुंबीयांनी अकोट (जि. अकोला) येथील ६५ वर्षीय वधू शोधून धूमधडाक्यात त्यांचे लग्न लावून दिले. विशेष असे की, या लग्नात खुद्द नवरदेवाने वन्हाड्यांसोबत आनंदाने ठेका धरला. या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत पसरली आहे. रहिमापूर चिंचोली येथील विठ्ठल खंडारे यांचे हे अनोखे लग्न सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. सर्वसंमतीने झालेल्या या विवाहाने मानवी जीवनातील स्त्रीचे अढळ स्थानदेखील अधोरेखित केले आहे. 

विठ्ठल खंडारे यांची पत्नी हयात नाही. त्यांना जीवनसंगिनीची आस होती तसा प्रयत्नही त्यांनी केला होता. पण, वयोमानापरत्वे स्वबळावर त्यांना ते शक्य झाले नव्हते तेव्हा त्यांनी आपल्या मनातील खंत आपल्या निकटच्या नातेवाइकांना बोलून दाखविली. त्याची तीव्रता समजून घेत आप्त-स्वकीयांनीदेखील संमती दिली. आणि वधू संशोधन सफल होऊन अल्पभूधारक शेतकरी असलेले विठ्ठल खंडारे यांना तिसऱ्या पत्नीच्या रूपात रखुमाई भेटली.

मुलाने दिली संमती विठ्ठल खंडारे यांची पत्नी तीन ते चार वर्षापूर्वी बुद्धवासी झाल्या. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या विवाहाचे मनोगत काही आप्त व मुलाजवळ बोलून दाखवले. कुटुंबीयांनी त्यांना विरोध केला तेव्हा लग्नाचा असफल प्रयत्नदेखील त्यांच्याकडून झाला होता. अखेर वडिलांचा हट्ट पुरवित मुलगा व सुनेने होकार दिला आणि अकोट येथील ६५ वर्षीय इंदूबाई दाभाडे यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. बौद्ध पद्धतीने विवाहविधी पार पडले.

सर्वजण सहभागीरहिमापूर ठाण्याच्या पुढ्यातच झालेल्या या विवाहाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. अनेक मान्यवरदेखील आपल्या परिवारासह या सोहळ्याला उपस्थित होते. विठ्ठल खंडारे यांच्यासह त्यांच्या गोतवळ्याने मोठ्या आनंदाने संगीतावर ठेका धरला होता.

विठ्ठलरावांचा गोतावळाविठ्ठल खंडारे यांना एकूण पाच मुले व एक मुलगी आहे. या सर्वांचे लग्न झाले आहेत. १० ते १२ नातवंडे या कुटुंबात आहेत. त्या सर्वांनी मिळून विवाह सोहळा पार पाडला. सर्वजण खुश होते.

टॅग्स :Amravatiअमरावतीmarriageलग्न