शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

राज्यात बिबट्यांची संख्या वाढली; अधिवासासाठी जंगल अपुरे, आता शहराकडे धाव

By गणेश वासनिक | Updated: January 14, 2024 17:26 IST

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० इतकी झाल्याची नोंद आहे.

अमरावती : राज्यात चांद्यापासून तर बांध्यापर्यंत जंगल अथवा नागरीवस्तीत सहजतेने बिबट आढळत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. हल्ली बिबट्यांची संख्या १६९० ईतकी नोंद झाली असून त्यांना अधिवासासाठी जंगल अपुरे ठरत आहे. परिणामी शिकार किंवा अन्नाच्या भटकंतीसाठी बिबट्यांनी शहराकडे धाव घेतल्याचे वास्तव आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० इतकी झाल्याची नोंद आहे. त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्याचा समावेश नाही. मात्र नैसर्गिक, रस्ते, रेल्वे अपघात, विहिरीत पडून, शिकार, विजेच्या प्रवाहासह इतर कारणांमुळे सन २०११ ते २०२१ या दरम्यान गत दहा वर्षात ८६२ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. विशेषत: २०२० मध्ये सर्वाधिक १७२ बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. ८६२ बिबट्याच्या मृत्युपैकी ८८ घटना शिकारीच्या २८ घटना विजेचा धक्का लागून, १३ विषबाधा तर २७ बिबटे सापळा आणि फासमध्ये अडकून असे एकूण १५६ घटना शिकार व शिकारजन्य कारणामुळे घडलेल्या आहेत. तर बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे ४३ टक्के इतके आहे. राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो स्थापन झाल्यास हा आकडा अतिशय कमी प्रमाणावर आणता येऊ शकतो, असा अहवाल राज्याच्या वन्यजीव विभागाने केंद्र शासनाला डिसेंबर २०२३ मध्ये पाठविला आहे. बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांच्या संख्या वाढत आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार सर्वच क्षेत्रात असल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरही त्याचा मृत्यूच्या घटना घडतात. या कारणामुळेच मानव- बिबट्यांचा संघर्ष वाढतो आणि बिबट्यांचे मृत्यू व मानवहानीच्या घटण्यामध्ये वाढ झाली आहे. - यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक अमरावती.नागपूर हिवाळी अधिवेशनातही गाजला बिबट

अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरात ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत बिबट ठिय्या मांडून होता.त्याच्यापासून नागरिकांना धोका होऊ नये, यासाठी पोलिस आणि वन विभागाची चमू सुरक्षिततेसाठी तैनात होती. मात्र, हा बिबट जेरबंदकरावा म्हणून आमदार सुलभा खोडके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले होते. अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट जेरबंद करावा, असे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा बिबट जेरबंद करून मेळघाटच्या जंगलात सोडण्यात आले. तब्बल अडीच महिन्यानंतर अमरावतीकरांना बिबट्यापासून सुटका मिळाली, हे विशेष.

टॅग्स :leopardबिबट्याAmravatiअमरावती