लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : महिन्याभरापासून मेळघाटच्याजंगलात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगी लागत असून रविवारी रात्री ८ च्या सुमारास परतवाडा-धारणी मार्गातील बिहाली नर्सरीच्या मागे जंगल पेटले. हे दृश्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे मन विचलित करणारे ठरले आहे.
महिन्याभरापासून गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वनवा धुमसत आहे. घटांग परिक्षेत्रातील बिहाली परिसरात रविवारी रात्री वणव्याने जंगल कवेत घेतले. परतवाडा-धारणी-खंडवा या आंतरराज्य महामार्गावर बुरघाट ते हरिसाल पर्यंत रात्री व दिवसादेखील ये-जा करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात जंगल पेटतानाचे दृश्य दृष्टीत पडत आहे.
बिहाली नर्सरी खोऱ्यात पसरला वणवारविवारी रात्री ८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग धुमसत असल्याचे दिसून आले. महिन्याभरात चार ते पाच वेळा घटांग परिक्षेत्रात मुख्य मार्गालगतच्या वणवा पेटला आहे. अहोरात्र वनकर्मचारी, अंगारी आग विझवत आहे.
आगी लावण्याचे षडयंत्रमेळघाटच्या जंगलात दीड महिन्यापासून ठिकठिकाणी आगी लावल्या जात असल्याचा प्रकार मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, वन व व्याघ्र प्रकल्पाला हे आरोपी सापडत नसल्याचे सत्य आहे. हेतुपुरस्सर जंगल जाळले जात असल्याची चर्चा बोलकी आहे.
मेळघाटचा स्वर्ग आगीच्या कवेतमेळघाटचा स्वर्ग आणि अतिसंरक्षित जंगल कोलकासलासुद्धा २० दिवसापूर्वी तिन्ही बाजूने वनवा पेटला होता. ही आगसुद्धा बदला घेण्याच्या हेतूने समाजकंटकांनी लावल्याची माहिती आहे.
सॅटेलाइट यंत्रणा फेल?देहरादून व इतर ठिकाणावरून आगीवर नियंत्रणासाठी सॅटेलाईट यंत्रणेचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येते. वारंवार मेळघाट जंगलात आगी लागत असताना पूर्वसूचना व आगीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कुठे आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.