शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

इंग्रजांची देण; माखला गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराई, गावात दोन हजारपेक्षा जास्त आंब्यांची झाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 11:26 IST

सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मनीष तसरे -

अमरावती : इंग्रज भारत सोडून गेले, मात्र जाताना ते अनेक गोष्टी भारतात सोडून गेले. भारत सोडताना त्यांनी अनेक इमारती, उद्योग, रेल्वे, बोगदे, पूल असं बरंच काही भारतात आपली आठवण म्हणून ठेवून गेले. सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून ९७४ मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात २०० च्या वर आंब्यांचे वृक्ष असणारी आमराईदेखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे १७०० लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्या घडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. असे आले इंग्रज माखल्यात :माखला या गावात खुमानसिंह या राजाचं राज्य होतं, असं गावकरी सांगतात. १८५७ च्या राष्ट्रीय उठावादरम्यान तात्या टोपे यांनी माखला गावातील खुमानसिंह राजाच्या राजवाड्यात आश्रय घेतला होता. तात्या टोपेंचा पाठलाग करीत इंग्रज घनदाट जंगल परिसरात असलेल्या माखला गावात पोहोचले. इंग्रजी फौज येत असल्याची चाहूल लागताच तात्या टोपेंनी तिथून पळ काढला. तात्या टोपेंना सहारा दिला म्हणून इंग्रजांनी या परिसरातील एकूण दीडशे कोरकू आदिवासी बांधवांना फाशी दिली आणि त्यांचे मृतदेह पहाडाखाली खोल दरीत फेकून दिले. तेव्हापासून माखला गावापासून काही अंतरावर असणारी दरी ही भूतखोरा या नावानं ओळखली जाते.

इंग्रज माखल्याच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात : मेळघाटातील अतिशय उंच भागांपैकी एक असणारा माखला हा परिसर पाहून इंग्रज भारावून गेले होते. या परिसराचा विकास व्हावा अशी कल्पना इंग्रजांना सुचली. त्यावेळी विविध फळझाडांनी बहरलेल्या या भागात इंग्रजांनी आंब्याची २०० झाडे आणून लावली. काही वर्षांतच इंग्रजांची आमराई बहरली. आज माखला गावात दोन हजारांच्यावर आंब्याची झाडं आहेत.

काेड गावातील प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात आंब्याचं झाड आहे. येथील लोकांनी या आंब्याला वेगवेगळी नावेदेखील दिली आहेत. याशिवाय येथील परिसरात कोळशी, कुंकू, आरंग, जांभूळ, वड, हिरडा, मोह, उंबर, आदी प्रकारचे वृक्ष आहेत. शिवाय यासह निळसर पांढऱ्या रंगाची नाजूक फुलं तसंच रानचमेली, कारवी, माहोळ, आदी वेलीही या भागात आढळतात. मेळघाट पर्यटकांनी या ठिकाणी फक्त वाघ पाहायला न येता येथील संस्कृती, येथील झाडेसुद्धा पाहायला यायला हवे. - प्रदीप हिरुळकर (मेळघाटचे जाणकार)

आदिवासींच्या भाषेतील आंब्याचे प्रकारइंग्रजांनी निर्माण केलेल्या माखल्याच्या आमराईमध्ये विविध प्रजातीचे आंबे आहेत. त्यात गोब्या आम, कटर आम, शिकल आम, ढपका आम, डोकोडोको आम, गुरगुटी आम अशा आगळ्यावेगळ्या नावानं या भागातील आंब्याच्या प्रजाती ओळखल्या जात असल्याची माहिती माखला गावातील रहिवासी असणाऱ्या लाडकीबाई जामुनकर यांनी दिली. 

टॅग्स :MangoआंबाAmravatiअमरावती