शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्यांचा 'डबल गेम' शिक्षकांमध्ये वाढला रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:06 IST

बदली आदेशानंतर पुन्हा बदल्यांसाठी प्रक्रिया : मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांचे वेधले अन्यायग्रस्त शिक्षकांनी लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सन २०२३-२४ या वर्षात जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामध्ये बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे ऑनलाईन आदेशही मिळाले आहेत. असे असताना पुन्हा सन २०२४-२५ या वर्षातील शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बदली प्रक्रियेत पुन्हा याच शिक्षकांच्या बदलीच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवृत्त केले जात आहे. शिक्षण विभागाच्या या दुटप्पी धोरणाविरोधात मंगळवारी अन्यायग्रस्त शिक्षकांनी जिल्हा परिषद सीईओंकडे धाव घेत हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२५ला प्रारंभ झाला आहे. परंतु, ही प्रक्रिया राबविण्यापूर्वीच यंदाच राबविलेल्या बदली प्रक्रियेत ऑनलाईन बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या बदल्या शिक्षकांना मान्य आहेत. सदर बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत जाण्यासाठी अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही. असे असताना आता पुन्हा सुरू केलेल्या ऑनलाईन बदली झालेल्या शाळा दाखवून याच वर्षी पुन्हा बदली प्रक्रियेत भाग घेण्यास या शिक्षकांना प्रवृत्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नुकतीच पूर्ण होत असलेली बदली प्रक्रिया ही अमरावती जिल्ह्यासाठीच राबविण्यात आलेली आहे.

इतर जिल्ह्यात ही राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सुरू होत असलेली बदली प्रक्रिया ही अमरावती जिल्हा वगळून व्हावी व ऑनलाईन बदली प्रक्रिया २०२५ मध्ये वगळण्यात येऊन अन्याय दूर करावा, अशी मागणी सीईओंकडे तुळशीदास धांडे, राधा मोहोड, मंजुश्री मांजरे, महेंद्र फुके, संगीता मंडे, सुरेश ठाकूर, विजय पुसलेकर, प्रकाश बावनकुये, वर्षा धुळे व शिक्षकांनी केली. 

एकाच वर्षी दोनवेळा बदल्या कशा?काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण होत असताना आता पुन्हा बदली झालेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत सहभागी करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वर्षात दोनदा शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया कशी, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती