शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'डीपीसी'तून जिल्ह्याला मिळणार ९०० कोटी; १२ पीएम मित्रा पार्कपैकी एक पार्क अमरावतीमध्ये होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:01 IST

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : केंद्रीय अर्थसंकल्पावर फोकस; शहराला सीसीटीव्हीचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा विकास समितीच्या माध्यमातून तब्बल ९०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली. ना. बावनकुळे हे अमरावतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेतून केंद्र व राज्य सरकारच्य योजना, निधीच्या तरतुदीची माहिती सांगितली. पालकमंमत्र्यांनी जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेत जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिंचन, पुनर्वसन, जलसंधारण, आरोग्य, आदींबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार रवी राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सीईओ संजिता महापात्रा आदी उपस्थित होते. सिंचन हा शासनाचा प्रथम प्राधान्याचा विषय असल्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

'आपला दवाखाना' येथे डॉक्टरांची व्यवस्था कराजिल्हा परिषदेत आढावा घेताना सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. डॉक्टरांसाठी कमी मुदतीत मुलाखती घेण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती करण्यात यावी. प्रामुख्याने 'आपला दवाखाना' येथे डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशा सुचना त्यांनी केल्या.

डिजिटल शाळांसाठी सीएसआरमधून निधीसर्व शाळा, अंगणवाडीमध्ये वीज पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी पाणी आणि फिल्टरची व्यवस्था करण्यात यावी. येथे डिजीटल अंगणवाडी आणि शाळा तयार करण्यात येईल. यासाठी एसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

अर्थसंकल्पावरही फोकसअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचे अत्यंत महत्त्वाचे बजेट मांडले आहे. हे अतिशय चांगले आहे. आता १२ तास असलेल्या उन्हापासून सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती तयार केली जाणार आहे. ४.४ टक्के वित्तीय तूट भरून आणण्याकरिता प्रयत्न अर्थसंकल्पात आहे. सर्वसमावेशक विकास करण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या स्थानी आली पाहिजे, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प असल्याचे ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावती