शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

येणी शिवारात प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्य संबंधाचा क्रूर शेवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

जमिनीवर रिंग होत असलेला मोबाईल ठाणेदारांनी उचलला. पलीकडून उत्तर आले, माझ्या पतीचा हा मोबाईल आहे. त्यांचा मृतदेह माझ्यापुढे आहे आणि सोबत महिला आहे, हे ठाणेदारांनी सांगताच दोघांचेही नावे फोनवरून सांगण्यात आली आणि या प्रकरणाचे कोडे सुटले. प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्य संबंधाचा क्रूर शेवट झाला. प्राथमिक तपासात सुधीर बोबडे याने बाहुपाशात असलेल्या महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास  पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. ताफा येणी पांढरी शिवारात एका शेतातील शेडमध्ये पोहोचला. डोळ्यासमोर दृश्य थक्क करणारे होते. जमिनीवर रिंग होत असलेला मोबाईल ठाणेदारांनी उचलला. पलीकडून उत्तर आले, माझ्या पतीचा हा मोबाईल आहे. त्यांचा मृतदेह माझ्यापुढे आहे आणि सोबत महिला आहे, हे ठाणेदारांनी सांगताच दोघांचेही नावे फोनवरून सांगण्यात आली आणि या प्रकरणाचे कोडे सुटले. प्रेमीयुगुलाच्या विवाहबाह्य संबंधाचा क्रूर शेवट झाला. प्राथमिक तपासात सुधीर बोबडे याने बाहुपाशात असलेल्या महिलेची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, मात्र तो नेमका कुणाविरुद्ध, ते सद्यस्थितीत सांगता येणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले. परतवाडा-अकोला मार्गावरील येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतातील कृषिसाहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या शेडमध्ये बुधवारी सकाळी १० वाजता उघड झालेल्या घटनेत चायना चाकूचा वापर करण्यात आला. सुधीर रामदास बोबडे (५२, रा. वनश्री कॉलनी, कांडली) व ४८ वर्षीय महिलेचा  मृतांमध्ये समावेश आहे.  बँकेत जात असल्याचे सांगून महिला मंगळवारी दुपारी २ पासून घरातून बाहेर पडली.  कुटुंबीयांनी वारंवार मोबाईलवर संपर्क केला, परंतु प्रतिसाद दिला नाही. रात्री उशिरा बेपत्ता असल्याची तक्रार परतवाडा पोलिसात देण्यात आली होती. एसपी अविनाश बारगळ यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला.  अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, एसडीपीओ गौहर हसन, ठाणेदार संतोष ताले, उपनिरीक्षक देवेंद्र मेसकर, धीरज गुल्हाने, आतिश शेख, चंद्रकांत बोडसे, नाझिम शेख, नीलेश काळे, जय मेटांगे आदींनी घटनास्थळ गाठले. दरम्यान, सुधीर बोबडेवर बुधवारी अंत्यसंस्कार झाले. महिलेची उत्तरीय तपासणी झालेली नव्हती.  

सुधीरविरुद्ध हत्या आणि आत्महत्येचा गुन्हा?सुधीरने चायना चाकूने महिलेच्या पोटात, गळ्यावर वार केले. यानंतर स्वतःच्या पोटात व गळ्यावर वार करून जीवन संपविले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. मृतांच्या नातेवाइकांच्या बयानानंतर व प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतरच प्रकरणातील वास्तव कळू शकेल. 

फॉरेन्सिक टीम, पंचनामा, शवविच्छेदनतपासातील मुद्दे सुटू नये, यासाठी अमरावती येथून पाच जणांची फॉरेन्सिक टीम बोलावली होती. त्यांच्या चौकशीनंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 

मेल्यानंतरही डोळ्याला चष्मा, हाती चाकू घटनास्थळी मृतांच्या डोळ्याला चष्मा, पायात चप्पल-मोजे आहेत. दोघांच्या हातात एकच चाकू आहे. झटापटीच्या कुठेच खुणा नाहीत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचे हात रक्ताने माखले आहेत. मुठा बांधलेल्या आढळल्या. दोघांशिवाय तिसरा कोण, यावर आता मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीमुळे पुढे आले आहे. त्यापूर्वी दोघांनी सोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची कुजबुज या प्रकरणाच्या अनुषंगाने पसरली होती. 

दुचाकीने घटना उघडकीससुधीर बोबडे याने त्याच्या दुचाकीने अलका दोडके यांना घटनास्थळी घेऊन गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. मंगळवारी दुपारपासून ही दुचाकी तेथेच उभी होती. त्यावरून परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी पर्स, मोबाईल, चायना चाकू व इतर साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले. 

दोघांचे विवाहबाह्य संबंध कुटुंबीयांना माहिती होते. महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी दाखल आहे. पतीकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.- संतोष ताले, ठाणेदार, परतवाडा

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस