शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद खंडपीठाने 'त्या' तिघांचा 'राजगोंड' जमातीचा दावा फेटाळला

By गणेश वासनिक | Updated: October 19, 2023 15:10 IST

रेकॉर्डमधील फेरफार हे संविधानाची चक्क फसवणूक, अभिलेख्यात नियमबाह्यरित्या खाडाखोड

अमरावती : किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या आदेशाविरोधात नेताजी चौधरी यांनी रिट याचिका क्र. ८८९४/२०२३ व प्राची चौधरी आणि पियूश चौधरी यांनी रिट याचिका क्र.८९३२/२०२३ उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केल्या होत्या. मात्र या याचिकांवर सुनावणी होऊन संविधानाची चक्क फसवणूक करणारे प्रकरण आहे, असे म्हणत औरंगाबाद खंडपीठाने या तिघांच्याही याचिका फेटाळून लावल्या, हे विशेष.

किनवट येथील कास्ट व्हिलिडीटी समितीने नेताजी चौधरी, प्राची चौधरी व पियूश चौधरी या तिघांनी त्यांचा 'राजगोंड' अनुसूचित जमातीचा दावा पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केला होता. या दाव्याच्या समर्थनार्थ या तिघांनीही बरेच शालेय, महसूली पुरावे तसेच जातवैधता प्रमाणपत्र समितीसमोर सादर केले होते. समितीने या तिघांच्या 'राजगोंड' जमातीच्या दाव्या प्रकरणी पोलिस दक्षता पथकामार्फत चौकशी केली. समितीने या तिघांनी सादर केलेली शालेय व महसूली कागदपत्रे तसेच पोलिस दक्षता पथकाचा अहवाल आदी बाबींचा अभ्यास करून त्यांच्या 'राजगोंड' जमातीचा दावा अवैध ठरविला आहे.

अभिलेख्यात नियमबाह्यरित्या खाडाखोड

उच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे नेताजी चौधरी यांनी सादर केलेल्या शालेय पुराव्याबाबतचे निरीक्षण विचारात घेतले. न्यायालयाच्या निरिक्षणानुसार नेताजी चौधरी यांनी सादर केलेल्या सर्व शालेय अभिलेखामध्ये 'राजगोंड' या अनुसूचित जमातीचा लाभ घेण्याच्या हेतूने नियमबाह्यरित्या खाडाखोड करुन जातीच्या रकान्यात बदल केला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन न्यायालयाने तिघांच्याही दाखल रिट याचिका फेटाळून लावल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. एस. एम. विभुते यांनी युक्तिवाद केला. तर शासनाच्या वतीने ॲड. ए.एस.शिंदे यांनी युक्तिवाद केला.यांनीही 'जात' बदलली

बालाजी गणपतराव चौधरी, शांता देविदास चौधरी, शलोका माणिकराव चौधरी, सुरेश गुणवंतराव चौधरी, अनुसया गोविंद चौधरी व स्वतः नेताजी माणिकराव चौधरी यांनी जिल्हा परिषदेच्या होनाळी शाळेतील शालेय अभिलेखात खाडाखोड करुन जातीच्या रकान्यातील 'तेलंग' हा शब्द खोडून त्या ठिकाणी 'राजगोंड' शब्द लिहिला असल्याचे निरिक्षण नोंदविले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी राज्याचा जातपडताळणीचा कायदा वैध ठरविला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करुन घेतलेले लाभ वसूल करण्यात यावे. तसेच संबंधिताच्या रक्तनात्यातील सर्वांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात यावे.

- रमेश मावसकर, सेवानिवृत्त उपायुक्त, अमरावती महसूल

टॅग्स :Courtन्यायालयAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीCaste certificateजात प्रमाणपत्रAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ