शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

महाज्योतीवरील अशासकीय संचालकांच्या नेमणुका नव्या सरकारने केल्या रद्द

By गणेश वासनिक | Updated: August 29, 2022 12:33 IST

प्रा दिवाकर गमे यांनी ओबीसी विद्यार्थी आणि महाज्योतीचे मानले आभार

अमरावती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या ओबीसी विजेएनटी व एसबीसी विद्यार्थी व समाजासाठी स्थापन झालेल्या संस्थेवर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने, अशासकीय संचालक म्हणून प्रा. दिवाकर गमे, डाॅ. बबनराव तायवाडे व लक्ष्मण वडले यांची नेमणूक ११ ऑगस्ट २०२० ला शासन निर्णय काढून केली होती. या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून सुमारे ८२४ कोटी रूपयाचा निधी आणून, महाज्योतीच्यावतीने विद्यार्थ्यांंसाठी विविध योजना कार्यान्वित करून त्याचा लाभ देण्यात आला.

३० जून ला राज्यात सत्ताबदल झाल्यावर नवीन शिंदे, फडणवीस सरकारने, जुन्या नियुक्त्या कुठलेही कारणे न देता रद्द करण्याचा सपाटा सुरू केलेला होता. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने महाज्योतीवरील तीनही अशासकीय संचालकांच्या नेमणुका शासन निर्णय काढून त्या रद्द करण्यात आल्या आहे.  

महाज्योतीवर निर्मितीनंतर प्रथम संचालक म्हणून महाज्योतीची ओबीसी विद्यार्थीभिमुख योजनांची बांधणी करण्याची, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाली. ओबीसी  विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्याच्या  ७२ वर्षानंतर  विविध लाभाच्या व स्पर्धा पुर्व प्रशिक्षणाच्या मोफत योजना राबविण्यात आल्या. वर्ग ११ वी  सायंसमधे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना जेईई नीटचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण, त्यासाठी मोफत ब्रॅंडेड कंपनीचा टॅब व दररोजचे सहा जीबी इंटरनेट असे उपक्रम सुरू केले.

महाज्योतीच्यावतीने आगामी तीन वर्षात प्रत्येक ओबीसी विजेएनटी विद्यार्थ्यांच्या घरी महाज्योतीचा टॅब ही महाज्योतीची संकल्पना राबविली. ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत कमर्शियल पायट ट्रेनिंग सुरू करून सामान्य ओबीसी विद्यार्थ्यांचे पायलट बनविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. ज्ञानज्योती  सावित्री बाई फुले यांच्या जन्मगावी नॅशनल डिफेंस अकादमी स्पर्धा पूर्व २०० मुलींचे मोफत निवासी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

या सर्व संधी दिल्या बाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे प्रा. दिवाकर गमे यांनी आभार मानले. तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण सतत संघर्ष करीत राहु, असा निर्धार प्रा. गमे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Educationशिक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीStudentविद्यार्थी