ठाणेदार आत्रामसह जमादार खंडारेंची उचलबांगडी
By Admin | Updated: October 10, 2016 00:10 IST2016-10-10T00:10:49+5:302016-10-10T00:10:49+5:30
सचिन सिमोलिया हत्या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठाणेदार प्रमेश आत्राम व पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव खंडारे यांची उचलबांगडी करून...

ठाणेदार आत्रामसह जमादार खंडारेंची उचलबांगडी
नियंत्रण कक्षाला ‘अटॅच’ : पोलीस आयुक्तांची कारवाई
अमरावती : सचिन सिमोलिया हत्या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत ठाणेदार प्रमेश आत्राम व पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव खंडारे यांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाला 'अटॅच' करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त मंडलिक यांच्या आदेशाने शनिवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली.
सचिन सिमोलिया प्रकरणात ठाणेदार आत्राम यांनी चौकशीमध्ये तत्परता दाखविली नाही. चौकशीला विलंब लावून आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात आत्राम यांना निलंबित करण्याची मागणी रिपाइंच्या माध्यमातून सिमोलिया कुटुंबाने रेटून धरली होती. रिपाइंने आंदोलन छेडून आत्राम यांनाच सहआरोपी करण्याची मागणीसुद्धा केली होती. प्रकरणाचे गांभीर्य बघून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलीस उपायुक्त शशीकुमार मीना यांच्याकडे चौकशी सोपविली होती. दरम्यान सिमोलिया कुटुंबियांनी पोलीस महासंचालक माथुर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडली होती. चौकशीत आत्राम यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सीपींनी आत्राम व खंडारे यांची उचलबांगडी केली. आता फे्रजरपुरा ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक सुखदेव वंजारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सचिन सिमोलीया प्रकरणात पीआय आत्राम यांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
- दत्तात्रय मडंलिक,
पोलीस आयुक्त.