ठाकुरांनी घेतली वीज वितरणची झाडाझडती

By Admin | Updated: June 9, 2015 00:33 IST2015-06-09T00:33:22+5:302015-06-09T00:33:22+5:30

तिवसा मतदारसंघातील रामा, भातकुलीसह इतरही गावांतील नागरिकांनी २०११-१२ पासून कृषी पंपाच्या जोडणीसाठी पैसे..

Thakur took electricity distribution tree | ठाकुरांनी घेतली वीज वितरणची झाडाझडती

ठाकुरांनी घेतली वीज वितरणची झाडाझडती

प्रतीक्षा यादीनुसार हवी जोडणी : २०१२ पासून पैसे भरलेले अर्ज प्रलंबित
अमरावती : तिवसा मतदारसंघातील रामा, भातकुलीसह इतरही गावांतील नागरिकांनी २०११-१२ पासून कृषी पंपाच्या जोडणीसाठी पैसे भरूनही अद्याप जोडणी नाही याविषयी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगूल यांना जाब विचारीत धडक सिंचन विहिरीची जोडणी आदीविषयी सोमवारी अमरावती येथे वीज वितरण कंपनी कार्यालयात शेतकऱ्यासह जावून झाडाझडती घेतली.
तिवसा मतदारसंघासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार ते पाच वर्षापूर्वी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पैश्याचा भरणा केला मात्र अद्यापपर्यंत त्यांना कनेक्शन देण्यात आलेले नाही, अशी विचारणा आ. यशोमती ठाकुर यांनी केली. यावर अधीक्षक अभियंता घुघूल यांनी सांगितले जिल्ह्यात इन्फ्रा-२ साठी २७ निविदा काढण्यात आल्या. यापैकी २ निविदा मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. निधी प्राप्त आहे मात्र पीक निघाल्यानंतर कामे हाती घेण्यात येणार आहे.
एक वर्षानुसार शेतकऱ्यांना वीज पंपाची जोडणी देण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी अभियंता बथेरिया, मुकदर पठाण, कल्पेश पांडे, वैभव वानखडे, रितेश पांडव, अंकूश बन्सोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

प्रतीक्षा यादीनुसार हवे कनेक्शन
कृषी पंपांना वीज जोडणीसाठी ४ वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेत त्यांना या प्रतिक्षा यादीनुसार शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन द्यावे अशी मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी केली. शेंदूरजना (माहूरा) येथील डिबीचे काम व दलित शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचे काम त्वरीत सुरू करावे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Thakur took electricity distribution tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.