टीईटी परीक्षा आता ३१ ऑक्टोबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST2021-09-23T04:14:09+5:302021-09-23T04:14:09+5:30

अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पुढे ढकलण्यात आली ...

The TET exam is now on October 31 | टीईटी परीक्षा आता ३१ ऑक्टोबरला

टीईटी परीक्षा आता ३१ ऑक्टोबरला

अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. परिषदेने टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, आता ३१ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. यासाठी राज्यभरातून ३ लाख ३० हजार ६४२ मतदान नोंदणी केली आहे. राज्यात १० ऑक्टोबरला टीईटीची परीक्षा होणार होती. परंतु याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा असल्याने टीईटीसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना येत्या काळात होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे.

बॉक्स

सुधारित वेळापत्रक असे

प्रवेश प्रिंट काढणे १४ ते ३१ ऑक्टोबर

परीक्षा पेपर एक ३१ ऑक्टोबर १०.३० ते १

परीक्षा पेपर दोन २ ते ४.३०

Web Title: The TET exam is now on October 31