शेंदूरजना खुर्द येथे बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:50+5:30
गुरुवारी व शुक्रवारी विद्यार्थ्यांना कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट दिसल्याने शेंदूरजना खुर्द येथे शाळेत जाणारे विद्यार्थी गेले नाहीत. तसेच या परिसरात काही शेतकऱ्यांना सायंकाळी बिबट दृष्टीस पडला. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री दरम्यान शेतात ओलीत करण्यासाठी जाण्यास शेतकरी धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे.

शेंदूरजना खुर्द येथे बिबट्याची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथे सहा दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे कामनापूर घुसळी येथील विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले आहे. दरम्यान रात्रीला शेतात ओलीत करण्याकरिता जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेंदूरजना खुर्द या परिसरात जंगल आणि पाणीसाठे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सहा दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात दिसून येत आहे. गुरुवारी व शुक्रवारी विद्यार्थ्यांना कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट दिसल्याने शेंदूरजना खुर्द येथे शाळेत जाणारे विद्यार्थी गेले नाहीत. तसेच या परिसरात काही शेतकऱ्यांना सायंकाळी बिबट दृष्टीस पडला. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री दरम्यान शेतात ओलीत करण्यासाठी जाण्यास शेतकरी धजावत नसल्याचे एकंदरित चित्र आहे. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने गहू, हरभरा या पिकाला पाणी देणे महत्त्वाचे आहे. दिवसभर भारनियमन असल्यामुळे शेतकºयांना रात्री शेतात जाऊन ओलित करावे लागत आहे.
पाच दिवसांपासून वनविभाग बिबटाचा शोध घेत आहे. कुणावरही हल्ला झालेला नाही. तशी माहितीही नाही. त्यामुळे शेतकºयांनी भीती बाळगू नये.
- आशिष कोकाटे,
वनपरिक्षेत्र अधिकारी