राजुरा येथे भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST2021-05-14T04:12:55+5:302021-05-14T04:12:55+5:30

फोटो पी १३ राजुरा चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथे बुधवारी सायंकाळच्या दरम्यान अचानक आग लागली होती. तेथील ...

Terrible fire at Rajura | राजुरा येथे भीषण आग

राजुरा येथे भीषण आग

फोटो पी १३ राजुरा

चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथे बुधवारी सायंकाळच्या दरम्यान अचानक आग लागली होती. तेथील चार घरांना आगीचा विळखा बसला. यात कुठलिही जिवीतहानी झाली नाही.

प्राप्तमाहितीनुसार, राजुरा गावाला लागून शेतपरिसर असून त्याला लागूनच गावातील काही लोकांची घर देखील आहेत. गोमाजी टिके, सुरेश टिके, विनोद टिके व बंडू घरत यांच्या घराच्या मागच्या बाजूने असलेल्या इंधन व काडी कचऱ्याने अचानक पेट घेतला व याचे रूपांतर भीषण आगीमध्ये झाले. हवेच्या जोराने ही आग वाढतच गेली आणि सदर चारही आगीने कवेत घेतली. गावातील लोकांनी घरातील व्यक्ती व गॅस सिलेंडर तातडीने घरातून बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले व काही प्रमाणात आग आटोक्यात सुध्दा आली होती. काही वेळातच चांदूर रेल्वे पालिकेच्या अग्निशमन दलाने आग पुर्णत: विझविण्यात यश मिळविले. यात काही घरगुती साहित्य जळून खाक झाले.

Web Title: Terrible fire at Rajura