शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

‘सीएसआर’ निधीच्या वापराला यापुढे लागणार अटी-शर्तीचे कोंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:37 PM

ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी ग्रामविकास विभागाने नव्या अटी-शर्ती घालून दिल्या आहेत.

ठळक मुद्देअनियमितता झाल्यास कारवाईचा बडगामुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदांना मिळणाऱ्या ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी ग्रामविकास विभागाने नव्या अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. असा निधी ग्रामपंचायतींना प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर करताना काही ठिकाणी अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विनियोगाबाबत गाइड लाइन आखून देण्यात आल्या आहेत.केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या प्रमाणात काही विहित निधी कार्पोरेट सामाजिक जबाबदारी निधी अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ‘सीएसआर’ अंतर्गत सामाजिक बांधीलकी ठेवून समाजविकासासाठी खर्च करावयाचा आहे. या अंतर्गत काही कंपन्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकासकामांसाठी वस्तू वा रोख स्वरूपात निधी देतात. असा निधी ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर त्यात अनियमितता झाल्याची बाब उघड झाली. त्या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांनी सीएसआर निधी कसा खर्च करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सुचित केले होते. त्या पार्श्वभूमीवर सीएसआर निधी वापराबाबत ग्रामीण स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार कंपंन्यांनी सीएसआर अंतर्गत वस्तू स्वरूपात मदत केल्यास त्याविषयीची यथायोग्य तपशीलवार नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी. अशा वस्तू नियमित वापरात राहण्यासाठी त्या कंपन्यांकडून देखभाल निधी मिळत नसल्यास वार्षिक अंदाजपत्रकात तशी तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपन्यांनी सीएसआर निधी रोख स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्थेस दिल्यास सदर निधी स्वउत्पन्न म्हणून जमा करून खर्च करण्यात यावा, त्यासाठी शासनाच्या स्वउत्पन्नातून खर्च करण्याविषयीच्या तरतुदींचे पालन करावे, कंपन्यांनी हा निधी ठरावीक कामावर अथवा एखाद्या बाबीवर खर्च करण्याची अट टाकल्यास त्याच कामावर अथवा बाबीवर सर्व निधी खर्च करावा. तथापि, त्यासाठी अद्ययावत वित्तीय कार्यपद्धतीचे पालन करणे बंधनकारक असल्याची अट टाकण्यात आली आहे. तर कारवाईहीस्वउत्पन्न किंवा शासननिधीतून अनियमितता झाल्यानंतर ज्याप्रमाणे संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येते, त्याचप्रमाणे सीएसआर अंतर्गत प्राप्त निधीमधून खर्च करताना काही अनियमितता घडल्यास, संबंधितांविरुद्ध यथायोग्य कारवाई करण्यात येणार आहे. तसे निर्देश अधिनस्थ यंत्रणेला देण्यात आले आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिक