पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत

By Admin | Updated: June 28, 2015 00:24 IST2015-06-28T00:24:16+5:302015-06-28T00:24:16+5:30

जिल्ह्यात हवामानावर आधारित पीकविमा योजना पथदर्शक स्वरूपात राबविण्याचा निर्णय ६ जून रोजी शासनाने घेतला.

The term of the insurance policy expired before the sowing | पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत

पेरणीपूर्वीच संपणार पीक विम्याची मुदत

३१ जून अंतिम तारीख : जिल्ह्यात ७५ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी बाकी
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात हवामानावर आधारित पीकविमा योजना पथदर्शक स्वरूपात राबविण्याचा निर्णय ६ जून रोजी शासनाने घेतला. जिल्हा कृषी कार्यालयाद्वारा १५ जूननंतर योजनेची प्रसिध्दी करण्यात आली. प्रत्यक्षात पेरणीला २० जूननंतर सुरुवात झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त २५ टक्के क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. ३० जून रोजी म्हणजे अवघ्या दोन दिवसांत पीकविमा योजनेची मुदत संपत असल्याने या योजनेला किमान १ महिना मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
पीकपेरणी झाल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात पडणारा खंड व अतीपाऊस यामुळे नुकसान झाल्यास योजनेच्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य देणे हा योजनेचा मुख्य हेतू असल्याचे शासनाने योजनेच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात पावसाचा खंड किंवा अतीपाऊस याचा खरा धोका जुलै महिन्यात आहे. जून अखेरीस ३० ते ४० टक्के पेरणी होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यावेळी पेरणी पूर्ण होईल.

हे तर कर्जदार शेतकऱ्यांचे शोषण
खरीप २०१५ करिता ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत पीककर्जाची उचल केली, त्या शेतकऱ्यांना ही पीककर्ज योजना सक्तीची करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पेरणी व्हायची असली तरी विमा कंपनी मात्र बँकेतून विमा हप्त्याची कपात करणार असल्याने हे शेतकऱ्यांचे शोषणच आहे.

विमा कंपन्या जगविण्यासाठीच योजना
हवामानावर आधारित पीकविमा योजनेची मुदत ३० जून रोजी संपत आहे. या तारखेला जिल्ह्यात जास्तीत जास्त ३० टक्केच पेरणी होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात कर्जवाटप ५० टक्के झाल्याने विमा कंपन्यांचे फावले आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामधून विम्याचा हप्ता कपात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लाभाऐवजी विमा कंपन्या जगविण्यासाठीच या योजना आहेत काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

Web Title: The term of the insurance policy expired before the sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.