शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, आमदारासह भाजपचे दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 06:23 IST

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला.

अमरावती : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपतर्फे पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागले. त्यानंतर शहरात शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून रविवारी दिवसभर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता होती. अमरावतीमधील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारचा बंद पुकारणारे भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांना रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले; तर, भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता दिघडे यांनादेखील आशियाना क्लबमध्ये स्थानबद्ध करण्यात आले.

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, रबरी बुलेटचा वापर केला. शनिवारी पहाटे तीन वाजल्यानंतर परिसर शांत झाला. दोन दिवसांतील अनुचित घटनांसाठी जबाबदार व्यक्तींवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५० संशयितांना अटक करण्यात आली. तपास जारी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

पोलीस अधीक्षक परतवाड्यातपोलीस अधीक्षक अविनाश बारगळ शनिवारी रात्री अचलपूर-परतवाड्यात दाखल झाले. तेथे रविवारी भाजपने बंदची हाक दिली होती. पोलिसांनी जुळी शहरे पायी पिंजून काढत शांततेचे आवाहन केले. त्यामुळे तेथे हिंसाचाराचे गालबोट लागले नाही. वरूड शहरात बंद पुकारणाऱ्या सातजणांना अटक करण्यात आली.

पालकमंत्र्यांकडून शांततेचे आवाहनnपालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  अतिसंवेदनशील भागाची पाहणी करून शांततेचे आवाहन केले. nजिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी जे शक्य असेल, ते करण्याचे आदेश त्यांनी दिले. खासदार नवनीत राणा यांनीही काही भागांची पाहणी केली.

टॅग्स :AmravatiअमरावतीTripuraत्रिपुराBJPभाजपा