‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील ‘पोस्ट’वरून तणाव

By Admin | Updated: October 24, 2015 00:02 IST2015-10-24T00:02:59+5:302015-10-24T00:02:59+5:30

धार्मिक भावना दुखविणारे चित्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर अपलोड केल्याने स्थानिक चपराशीपुरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती.

Tensions from 'Posts' on WhatsAppSpace | ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील ‘पोस्ट’वरून तणाव

‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील ‘पोस्ट’वरून तणाव

चपराशीपुऱ्यातील घटना : विशिष्ट समुदाय संतप्त, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
अमरावती : धार्मिक भावना दुखविणारे चित्र ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर अपलोड केल्याने स्थानिक चपराशीपुरा परिसरात शुक्रवारी सायंकाळी तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. विशिष्ट समुदयातील हजारो नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेऊन पोलीस उपायुक्तांना घटनेची माहिती दिली. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच संतप्त जमाव शांत झाला
शहरातील काही युवकांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर फे्रन्डस नावाचा समूह तयार केला होता. मात्र, शुक्रवारी दुपारी या समूहातील एका युवकाने विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखविणारे छायाचित्र अपलोड केले. हे छायाचित्र पाहून त्या समुदायातील काही नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यांनी एकत्रितपणे पोलीस आयुक्तालय गाठले. त्यानंतर त्यांनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली असून या प्रकरणातील दोषींवर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Web Title: Tensions from 'Posts' on WhatsAppSpace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.