शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘जुन्या पेन्शन’ने वाढले जिल्हा प्रशासनाचे टेन्शन; कर्मचारी संपाचा नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 17:37 IST

कार्यालये ओस, दुसऱ्या दिवशीही धरणे

गजानन मोहोड

अमरावती : शासकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्याने शासनाचे कामकाज प्रभावित झाले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले. या संपामुळे आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झालेली आहे. कर्मचारी रस्त्यावर असल्याने कार्यालये ओस पडली आहेत व कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला परतावे लागल्याचे दिसून आले.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत धरणे दिले. सध्या कंत्राटी दहावी व बारावीच्या परीक्षेत कुठलाही अडथळा येऊ नये, यावर प्रशासनाचा वॉच आहे. दरम्यान,शासकीय कामकाजासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषदेसह अन्य विभागात आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला, जिल्हाधिकाऱ्यांद्वारा नियमित बैठका मात्र सुरू आहेत. मंगळवारी रेल्वे व विमानतळ संदर्भात व बुधवारी कृषी विभागाचा आढावा जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी घेतला.

संपात ११ हजार कर्मचाऱ्याचा सहभाग

जिल्ह्यातील २१ विभागांचे १०,०१८ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. याशिवाय अन्य चार ते पाच विभागांचे मिळून किमान ११ हजार कर्मचारी संपात आहे. याव्यतिरिक्त ३१ टक्के कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर उपस्थित आहे. याशिवाय तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल संपात सहभागी नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारAmravatiअमरावती