चांदूरबाजारात तणाव
By Admin | Updated: January 24, 2015 00:05 IST2015-01-24T00:05:04+5:302015-01-24T00:05:04+5:30
जनवरे नेणारे वाहन नेताजी चौकातून जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.

चांदूरबाजारात तणाव
सुरेश सवळे चांदूर बाजार
जनवरे नेणारे वाहन नेताजी चौकातून जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. क्षमतेपेक्षा अधिक जनावरे वाहून नेणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहन चालकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास स्थानिक नेताजी चौकातून वाहनात कोंबून जनावरे नेत असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिली. ठाणेदार डी.बी. तडवी ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले व त्यांनी वाहन ताब्यात घेऊन चालकावर कारवाई केली. बोलेरो कंपनीचा मालवाहू मेटॅडोर क्रमांक एमएच २७ जे ४२३ यात १० जनावरे नेण्यात येत होती.
वाहन मालकाचे नाव अजय पाटेकर असुन ही जनावरे ईशाद कुरेशी यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वाहनचालक सुशील पुरुषोत्तम लालतिवारी (वय ४६) यांचेवर प्राण्यांना निर्दयी वागणूक देण्यासंबंधी कलम ११(१) (क) (ड) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जनावरांना कोंडवाड्यात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाची कारवाई सुरु असतानाच लोकांनी आपसात वादावादी झाल्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमाव पांगविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पौनीकर यांच्या नेतृत्वात परतवाडा, अचलपूर, आसेगाव, शिरजगाव कसबा व चांदूरबाजारची पोलीस कुमक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. याच्या दिमतीला दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या बोलावाल्या असून संवेदनशील भागात तैनात केले आहेत. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांना घटनेची माहिती मिळताच तेदेखील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करुन आहेत. शहर व परिसरात मात्र सध्या शांतता आहे.