शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बेलोरा विमानतळाच्या डिझाईन, प्लॅनिंगची अखेर निविदा जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 9:53 PM

बहुप्रतीक्षित बेलोरा विमानतळाच्या विकासाची दारे खुलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई- निविदा काढली असून, महिनाभरात एजन्सी नेमली जाईल, अशी माहिती आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात ठरणार एजन्सी : राज्य शासनाला उशिरा आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित बेलोरा विमानतळाच्या विकासाची दारे खुलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई- निविदा काढली असून, महिनाभरात एजन्सी नेमली जाईल, अशी माहिती आहे.बेलोरा विमानतळ विकासासाठी शासनाने ७५ कोटी रूपये मंजूर केले. त्यानुसार १५ कोटींचा पहिला टप्पा वितरीत केला आहे.जानेवारीमध्ये विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण झाले. त्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविला. ओएलएस सर्वेक्षणानंतर डिझाईन, प्लॅनिंगसाठी यापूर्वी ई-निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, दोनच एजन्सींनी निविदेत सहभाग घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा नव्याने ई-निविदा काढल्या आहे. राष्ट्रीय स्तरावरील एजन्सींनी ई-निविदेत सहभागी व्हावे, यासाठी एका बड्या इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित झाली आहे. शिर्डीच्या धर्तीवर बेलोरा विमानतळ विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. मुंबईच्या एका एजन्सीने विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंगसाठी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे ई-निविदेअंती विमानतळाचे विकासाचे शिलेदार कोण होणार, हे महिन्याभरात स्पष्ट होईल.डिझाईन, प्लॅनिंगमध्ये या बाबींचा समावेशबेलोरा विमानतळ धावपट्टीची लांबी १८५० मीटर केली जाईल. टर्मिनल इमारत, अग्निशमन केंद्र, एटीसी टॉवर निर्मिती, अप्रन क्षमतेत वाढ, तीन एटीआर व एक एअर बस बोर्इंग, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, रस्ते चौपदरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा यंत्रणा, इमारत बांधकामाचे स्वरूप आदी विकासकामांचा समावेश असणार आहे.‘उड्ड्राण’मधून अमरावतीला निधी का नाही?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी ‘उड्डाण’ योजनेंतर्गत देशातील ७२ शहरांमध्ये विमानतळ निर्मितीची घोषणा केली होती. मात्र, राजकीय अनास्थेमुळे जमीन अधिग्रहीत असुनही बेलोरा विमानतळाचा विकास पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पुढाऱ्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून विमानतळाच्या विकासासाठी ‘उड्डाण’ योजनेतून निधी खेचून आणावा, अशी अपेक्षा आहे.बेलोरा विमानतळाच्या डिझाईन, प्लॅनिंगची निविदा निघाल्याने रखडलेले विकासकामे सुकर होतील. केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.- प्रवीण पोटे, पालकमंत्री