दहा आदिवासींना मिळाल्या जमिनी

By Admin | Updated: January 12, 2015 22:42 IST2015-01-12T22:42:12+5:302015-01-12T22:42:12+5:30

आदिवासींच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीची कोणतीच परवानगी न घेता भू-माफियांनी या जमिनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर महसूल प्रशासनाने या जमिनी आदिवासींना परत

Ten tribal lands | दहा आदिवासींना मिळाल्या जमिनी

दहा आदिवासींना मिळाल्या जमिनी

धामणगाव रेल्वे : आदिवासींच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीची कोणतीच परवानगी न घेता भू-माफियांनी या जमिनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर महसूल प्रशासनाने या जमिनी आदिवासींना परत देण्यासाठी युध्दस्तरावर मोहीम हाती घेतली आहे़ आतापर्यंत ४१ पैकी दहा आदिवासींच्या नावावर सातबारा चढवून तलाठ्यांनी जिल्हा प्रशासनाला अहवाल पाठविला आहे़ जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित ३१ जणांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे़
आदिवासींना मिळालेल्या त्यांच्या मालकीच्या जमिनींची विक्री करण्याकरिता शासनाची परवानगी अनिवार्य आहे़ परंतु या जमिनींची परस्पर विक्री करण्यात आल्या.

Web Title: Ten tribal lands