लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ब्रेक फेल झाल्याने भरधाव मिनीट्रक उलटून दहा मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळपूरनजीक घडली. जखमींना गावकऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.कैलास मणिसिंह राठोड, पंडित हरिदास राठोड, बबन फुलसिंह राठोड, नितेश रामा धुर्वे, गजानन मणिसिंह राठोड, राजू सूर्यभान राठोड, अमोल ज्ञानेश्वर आकोलकर, रामराव मणिसिंह राठोड, राजेश रामकिसन राठोड (सर्व रा. परसोडा, ब्राम्हणवाडा थडी), मंगेश बाळू घायर (रा. घाटलाडकी) अशी जखमींची नावे आहेत. चालक मंगेश हा एमएच ०४ एफडी ७२३५ या क्रमाकांच्या मिनीट्रकमध्ये सीताफळाचा माल घेऊन मंगळवारी रात्री कारंजा लाड येथे गेला होता. सीताफळ उतरविण्यासाठी त्याने दहा मजुरांना सोबत नेले. बुधवारी मंगेश हा मजुरांना मिनीट्रकमध्ये बसवून पुन्हा घाटलाडकीला परत येत होता. यादरम्यान गोपाळपूरजवळील रस्त्यावर मिनीट्रकचे ब्रेक फेल झाला आणि भरधाव वेगाने हे वाहन उलटले.अपघातात मिनीट्रकमध्ये असलेले दहाही मजूर गंभीर जखमी झाले. जखमींनी उपचारासाठी इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या माहितीवरून वलगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. इर्विनमध्ये दाखल रुग्णांचे बयाण नोंदवून पुढील कारवाई वलगाव पोलिसांनी सुरू केली होती.
मिनीट्रक उलटून दहा मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST
कैलास मणिसिंह राठोड, पंडित हरिदास राठोड, बबन फुलसिंह राठोड, नितेश रामा धुर्वे, गजानन मणिसिंह राठोड, राजू सूर्यभान राठोड, अमोल ज्ञानेश्वर आकोलकर, रामराव मणिसिंह राठोड, राजेश रामकिसन राठोड (सर्व रा. परसोडा, ब्राम्हणवाडा थडी), मंगेश बाळू घायर (रा. घाटलाडकी) अशी जखमींची नावे आहेत.
मिनीट्रक उलटून दहा मजूर जखमी
ठळक मुद्देवलगाव हद्दीतील घटना : जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार