दहा कुख्यात गुन्हेगार तडीपार
By Admin | Updated: July 4, 2016 00:03 IST2016-07-04T00:03:35+5:302016-07-04T00:03:35+5:30
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून सहा जणांचे प्रस्ताव...

दहा कुख्यात गुन्हेगार तडीपार
पोलीस आयुक्तांचे पाऊल : गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून सहा जणांचे प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मात्र, तरीसुध्दा गुन्हेगार वारंवार गुन्हे करतात. अशा गुन्हेगारावर वचक बसविण्यासाठी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येते. सहा महिन्यात शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल दहा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे, तर सहा आरोपींचा तडीपारीचा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. तडीपार आरोपींमध्ये विक्की हांडे (२४, लक्ष्मीनगर), अविनाश विनोद रणविर (रा.बडनेरा), संजय मनोहर आमले (रा.रेवसा), शेख शकील शेख अहमद (२०,रा. मुज्जफरपुरा), शेख मो.हुसैन(रा. मुज्जफरपुरा), दावेश प्रभुदास मनोहरे (रा. भीमनगर) यांचा समावेश आहे.