शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

दहा तास अनुभवला मृत्यूचा थरार वाटले संपले सारे; पण धीर ठेवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनची सीमा पार करून रोमानियात प्रवेश करण्याचे तब्बल दहा तास हा काळ मृत्यूचा थरार होता. सीमेवर एकच गर्दी, अनेक देशांतील नागरिकांचा गोंधळ, उणे सात अंश तापमान, बसायलाही जागा नाही, खायला, प्यायला काहीच नाही. एकमेकांच्या अंगावर बसलो. त्यातच गोंधळामुळे गोळीबारही झाला, काही जण जखमी झाले. क्षणभर वाटले, संपले सारे. एकमेकांना धीर दिला. देवाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या प्रेमामुळे सुखरूप परतल्याची आपबीती युक्रेनवरून जिल्ह्यात परतलेल्या स्वराज पुंड याने ‘लोकमत’ला सांगितली. युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली. आमच्या इमारतीखाली तात्पुरते बंकर तयार करण्यात आले होते. त्यामध्ये आम्ही २६ पर्यंत राहिलो. खाण्या-पिण्याची फारशी सुविधा नव्हती. आमच्या जवळ जे काही होते, त्यावरच दोन दिवस काढल्याचे स्वराज याने सांगितले.आम्ही दहा जणांनी मिळून बस केली व रोमानिया सीमेच्या आठ किमी अलीकडे उतरलो. तेथून पुढे पायवाटेने जावे लागले. वरून बर्फवृष्टी सुरू होती. जमिनीवरही बर्फ होता. अशा परिस्थितीत एकमेकांना धीर देत युक्रेनची सीमा गाठली व या दहा तासांच्या जीवघेण्या अनुभवानंतर रोमानियात सेफ झाल्याचे स्वराज म्हणाला.

सीमापारसाठी दहा जणांनी शेअर केली बसयुक्रेनमधून रोमानियाच्या सीमेवर जाण्यासाठी दूतावासाचे सहकार्य मिळाले नाही. दहा जणांनी मिळून बस भाड्याने घेतली. आठ तासांचा बस प्रवास व सहा तास पायी चालून आम्ही रोमानिया सीमेवर पोहोचलो. तिथे आधीच गर्दी असल्याने सीमापार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, असे स्वराज म्हणाला.

सीमेवर गोळीबार, नायजेरियन जखमीयुक्रेनच्या सीमेवर आफ्रिकन देशाचे अनेक नागरिक होते. त्यांच्यात सीमापार करण्यासाठी गोंधळ झाला. त्यामुळे हवेत गोळीबार करण्यात आला.  यामध्ये नायजेरियन तरुणाच्या पायाला गोळी लागली, तिथे पळापळही झाली. मी मागे फिरलो अन् ग्रुप विस्कळीत झाला. या गोंधळात अनेकांचे सामान फुटले, तुटले, कपडे फाडल्याचे त्याने सांगितले.

तीन प्रसंगी वाटले - वाचणार नाहीआठ दिवसांच्या काळात ज्यावेळी शहरावर अटॅक झाला, त्यानंतर बंकरमध्ये राहावे लागले व बाॅर्डर पार करण्याच्या वेळी गोळीबार, पळापळ या तीन प्रसंगी मी रडलो. कदाचित आपण वाचणार नाही, असे वाटले. संकटातून निघण्याची मानसिकता केली व आता घरी पोहोचल्याचे स्वराज म्हणाला.

ट्रांझिट व्हिसा पहिल्यास प्राधान्य

- रोमानियात आम्हाला ट्रांझिट व्हिसा देण्यात आला. येथे स्थानिक एनजीओंनी कॅम्प लावले होते. तिथे चांगली व्यवस्था झाली, ‘ऑपरेशन गंगा’सुरु झाल्याने भारताचे विमान आले. त्यामध्ये जे अगोदर पोहोचले त्यांना प्रवेश देण्यात आला. 

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी